टाकेदला अंगणवाडी सेविकांना विविध योजनांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 18:38 IST2021-02-04T18:24:07+5:302021-02-04T18:38:28+5:30
सर्वतीर्थ टाकेद : टाकेद येथे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी अंगणवाडी सेविकांना कुपोषित, अतिकुपोषित बालकांची तपासणी, गरोदर व स्तनदा मातांचे वजन, उंची घेऊन आहाराविषयी मार्गदर्शन केले. कुपोषित बालकांना कसा व कोणता आहार द्यावा, याविषयी उपस्थित मातांना माहिती दिली. सभेला मार्गदर्शन करून विविध योजनांची माहिती दिली.

टाकेदला अंगणवाडी सेविकांना विविध योजनांची माहिती
सर्वतीर्थ टाकेद : टाकेद येथे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी अंगणवाडी सेविकांना कुपोषित, अतिकुपोषित बालकांची तपासणी, गरोदर व स्तनदा मातांचे वजन, उंची घेऊन आहाराविषयी मार्गदर्शन केले. कुपोषित बालकांना कसा व कोणता आहार द्यावा, याविषयी उपस्थित मातांना माहिती दिली. सभेला मार्गदर्शन करून विविध योजनांची माहिती दिली. यावेळी इगतपुरी येथील महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी पंडित वाकडे, मुख्य पर्यवेक्षिका पूर्वा दातरंगे उपस्थित होते. टाकेद येथील अंगणवाडी क्र. २मध्ये सेविका, मदतनीस व महिलांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमृत आहार टप्पा एक व दोनची तसेच विविध प्रकारचा आहार लाभार्थ्यांपर्यंत नियमित वाटप करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. जलजीवन मिशनअंतर्गत सर्व अंगणवाड्यांना जोडणी देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी अनिता गायकवाड, सुनीता जाधव, सीता साबळे, सकु गागरे, सुमन मराठे, तारा परदेशी, लिया परदेशी, मंगल डोळस, सुनीता भांगे, अनिता खामकर, बसवंता वारघडे इत्यादी उपस्थित होत्या.
अंगणवाडी स्तरावरून ज्यांना जो आहार व इतर सेवा दिल्या जातात. त्याचा लाभार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात वापर करून आपले आरोग्य सुधारण्याची व कुपोषण कसे कमी होईल, याबाबत जागरूकता बाळगावी. वजन, उंची नियमित घेऊन कुपोषण निर्मूलनाचा अंगणवाडी सेविकांनी ध्यास घ्यावा.
दीपक चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी