नराधमावर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:56 IST2020-02-12T22:14:57+5:302020-02-12T23:56:04+5:30
सरकारने हिंगणघाट घटनेतील नराधमावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्र सेवा दलातर्फेअपर जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले. नायब तहसीलदार रवींद्र सायंकर यांनी निवेदन स्वीकारले.

हिंगणघाट घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रवींद्र सायंकर यांना देताना राष्टÑ सेवा दलाच्या स्वाती वाणी, शिल्पा देशमुख, सुजाता लोढा, शिल्पा देशमुख, नम्रता जगताप, पूनम सोनपसारे, वैदेही भगीरथ, पूनम सावळे, तुलसी मोरे, पूजा पंचारिया, क्षितिजा सोनार आदी.
मालेगाव : सरकारने हिंगणघाट घटनेतील नराधमावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्र सेवा दलातर्फेअपर जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले. नायब तहसीलदार रवींद्र सायंकर यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे की, देशासह राज्यातील महिलांना सन्मानाने जगता यावे हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे. जनता मात्र वैचारिक अधोगतीकडे जात आहे. हे थांबविण्यासाठी त्वरित कठोर उपाययोजना कराव्यात. महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत. देशभरातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना फाशीसारखी कठोर शिक्षा द्यावी, अँटी रेपिस्ट स्कॉडची निर्मिती करावी. यावेळी अवनी वाणी, रेखा उगले, सुधा बोरकर, नचिकेत कोळपकर, विलास वडगे, विकास मंडळ, रविराज सोनार, सुधीर साळुंके, फिरोज बादशहा, राजेंद्र भोसले, अशोक फराटे, सुनील वडगे, राजेंद्र दिघे, अशोक पठाडे, प्रवीण वाणी, प्रा. अनिल महाजन, आर. डी. निकम, जयेश शेलार, अभिजित सोनपसारे आदी उपस्थित होते.