तहसीलदारांनी केली सायकलवरून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:44 IST2019-08-05T00:43:33+5:302019-08-05T00:44:31+5:30
कळवण : तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक छोटे-मोठे तलाव व धरण साठ्यात वाढ झाल्याने व नदी-नाल्यांना पूर आल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. रविवारी कळवणचे प्रांतधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी अनेक गावांना भेट देऊन पाहणी केली.

तहसीलदारांनी केली सायकलवरून पाहणी
ठळक मुद्देप्रांतधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी अनेक गावांना भेट देऊन पाहणी केली.
कळवण : तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक छोटे-मोठे तलाव व धरण साठ्यात वाढ झाल्याने व नदी-नाल्यांना पूर आल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. रविवारी कळवणचे प्रांतधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी अनेक गावांना भेट देऊन पाहणी केली.
तहसीलदार बी.एस. कापसे व गटविकास अधिकारी डी.एम. बहिरम यांनी सकाळी ८ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत चणकापूर व गिरणा नदीकाठच्या गावांना सायकलने भ्रमंती करून भेटी दिल्या व नागरिकांशी चर्चा करून सतर्कतेचे आवाहन केले. कळवण, वाडी, एकलहरे, कळमथे, पाळे, अभोणा व चणकापूर येथे भेटी देऊन पाहणी केली.