तडीपार गुंड बाज्याला ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:20 IST2021-02-24T22:02:21+5:302021-02-25T01:20:34+5:30
नाशिक : नऊ महिन्यांसाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही विनापरवानगी शहरात वास्तव्य करणाऱ्या तडीपार गुंडाला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तडीपार गुंड बाज्याला ठोकल्या बेड्या
नाशिक : नऊ महिन्यांसाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही विनापरवानगी शहरात वास्तव्य करणाऱ्या तडीपार गुंडाला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यश उर्फ बाज्या राजेंद्र पाटील (२२, रा. भोर मळा, नाशिकरोड) असे ताब्यात घेतलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. सिडकोतील साईग्राम मैदानावर मंगळवारी (दि.२३) सायंकाळी बाज्या हा कोयता घेऊन फिरत असल्याचे आढळून आले. त्याच्याविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.