तडिपार बुºहाण शेख गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:49 IST2018-08-11T00:49:04+5:302018-08-11T00:49:22+5:30
नाशिक : शहर व जिह्यातून हद्दपार केलेले असताना शहरात वावर ठेवणाऱ्या वडाळागावातील तडिपार गुंडास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तडिपार बुºहाण शेख गजाआड
नाशिक : शहर व जिह्यातून हद्दपार केलेले असताना शहरात वावर ठेवणाऱ्या वडाळागावातील तडिपार गुंडास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडाळागावातील झिनतनगर यथेली बुºहाण शाकीर शेख (२०)असे अटक केलेल्या तडिपाराचे नाव आहे. त्याच्याविरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने शहर पोलिसांनी त्याला जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. मात्र तो शहरातच वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढून गुरुवारी दुपारी तो नाशिक-पुणारोडवरील बजरंगवाडीत आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. अधिक तपास हवालदार क्षीरसागर करीत आहेत.