शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

कवितांतून उलगडला ‘संस्कृतीचा सारांश’

By admin | Updated: March 7, 2016 00:13 IST

कुसुमाग्रज स्मरण : मराठीतील चार दिग्गज कवींना उजाळा

नाशिक : ग. दि. माडगूळकर, बा. भ. बोरकर, मंगेश पाडगावकर आणि कुसुमाग्रज हे चार कवी म्हणजे जणू संगीताची चार घराणीच... या चौघा दिग्गजांच्या कविता-गीतांतून त्यांच्या कवितांचे अनेकविध पदर उलगडले गेले अन् रसिकांना ‘संस्कृतीचा सारांश’ही उमजून गेला... कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘कुसुमाग्रज स्मरण’ उपक्रमात आज सायंकाळी कुसुमाग्रज स्मारकात ‘संस्कृतीचा सारांश’ हा कार्यक्रम रंगला. माडगूळकर, बोरकर, पाडगावकर व कुसुमाग्रज या चारही कवींच्या कवितांतून उत्कटपणे व्यक्त झालेल्या निसर्ग, समाज, माणूस आणि प्रीती या बाबी कार्यक्रमातून अलवारपणे उलगडल्या. त्या-त्या कवीचे बालपण, त्यांचा कवितेचा प्रवास तसेच या चार कवींवर एकमेकांचा पडलेला प्रभाव रंजकतेने मांडण्यात आला. माडगूळकर यांच्या अल्लड माझी प्रीत, आज सुगंधित झाले जीवन, बोरकर यांच्या प्रीतीची वाट, हळद लावुनी आले ऊन, पाडगावकर यांच्या छोरी, पंख असूनही, कुसुमाग्रजांच्या प्रेमयोग, प्रेम कर भिल्लासारखं आदि कवितांचे वाचन पंकज व अपर्णा क्षेमकल्याणी यांनी केले, तर गायक करण शिंदे यांनी दहा ठिकाणी विरली, पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा, नेहा मूर्ती यांनी सरीवर सरी, पाऊस कोसळे हा, रजिंदर कौर यांनी कोन्यात झोपली सतार, माझ्या मातीचे गायन ही सुरेल गाणी सादर केली. त्यांना रागेश्री धुमाळ (संवादिनी), आनंद शहाणे (तबला) यांनी संगीतसाथ केली. कार्यक्रमाची संकल्पना दिलीप साळवेकर यांची, तर संहिता अपर्णा क्षेमकल्याणी यांची होती. मार्गदर्शन रागिणी कामतीकर यांचे होते. यावेळी काही ध्वनिफितीही ऐकवण्यात आल्या. आमदार हेमंत टकले, अ‍ॅड. विलास लोणारी, लोकेश शेवडे, प्रा. मकरंद हिंगणे, अरविंद ओढेकर, डॉ. यशवंत बर्वे यांनी कलावंतांचा सत्कार केला. श्याम पाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. रसिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)