सुवर्णपदक पटकावणार्‍या जलतरणपटूंचा गौरव

By Admin | Updated: May 9, 2014 18:34 IST2014-05-09T18:32:09+5:302014-05-09T18:34:34+5:30

सातपूर : माजी प्रभाग सभापतींनी दिले ट्रॅकसूट भेट

Swimmers honoring the gold medal | सुवर्णपदक पटकावणार्‍या जलतरणपटूंचा गौरव

सुवर्णपदक पटकावणार्‍या जलतरणपटूंचा गौरव

सातपूर : माजी प्रभाग सभापतींनी दिले ट्रॅकसूट भेट
सातपूर : राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत दमदार कामगिरी बजावत सुवर्णपदक पटकावणार्‍या सातपूरच्या जलतरणपटूंना माजी प्रभाग सभापती विलास शिंदे यांच्या हस्ते ट्रॅकसूट भेट देऊन गौरविण्यात आले.
मालवण येथे आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सातपूरच्या आठ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात सहा वर्षांखालील गटात अनुष्का धात्रक हिने प्रथम क्रमांकावर विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले, तर १८ वर्षे वयोगटात प्रवीण चाळके याने तृतीय क्रमांक पटकावला. प्रावीण्य मिळविलेल्या आणि सहभाग घेतलेल्या जलतरणपटंूना नगरसेवक विलास शिंदे यांनी ट्रॅकसूट भेट देऊन गौरविले. यावेळी सातपूर तरणतलाव व्यवस्थापक सुनील देशपांडे, राजेंद्र साळी, भागवत आरोटे, दीपक आरोटे, कत्रोजवार आदि उपस्थित होते. आठ स्पर्धकांसह पाच प्रशिक्षकांनाही ट्रॅकसूट देऊन गौरविण्यात आले. (वार्ताहर)
फोटो - ०४ पीएचएमए- ९२- मालवण येथे झालेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेतील स्पर्धकांच्या गौरव समारंभाप्रसंगी नगरसेवक विलास शिंदे. समवेत गणेश गोहाड, अरुण पवार, राजेंद्र साळी, भागवत आरोटे, सुनील देशपांडे, कत्रोजवार आदि.

Web Title: Swimmers honoring the gold medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.