सफाई कामगारांचा सोमवारी लाक्षणिक संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 01:40 IST2021-08-07T01:39:21+5:302021-08-07T01:40:09+5:30

महापालिकेतील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी येत्या सोमवारी (दि. ९) एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस शहराध्यक्ष अनिल बेग यांनी दिली.

Sweepers strike on Monday | सफाई कामगारांचा सोमवारी लाक्षणिक संप

सफाई कामगारांचा सोमवारी लाक्षणिक संप

नाशिक - महापालिकेतील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी येत्या सोमवारी (दि. ९) एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस शहराध्यक्ष अनिल बेग यांनी दिली. महापालिकेतील बेकायदेशीर सफाई ठेक्याची पद्धत बंद व्हावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य येाजनेचे काटेकोरपणे पालन करावे, सफाई कामगारांना त्यांच्या व्यवसायानुसार नव्हे तर शैक्षणिक पात्रतेनुसार वर्ग तीनवर नियुक्ती द्यावी, २००५ पासून सफाई कामगारांचे बंद असलेली कर्मचाऱ्यांची पेन्शन आणि प्रॉव्हिडंट फंड पुन्हा सुरू करावा, अशा मागण्यांसाठी राज्यभरात हे आंदोलन होणार आहे.

Web Title: Sweepers strike on Monday