स्वामी नारायण चौकात वाहतुकीची कोंडी कायम
By Admin | Updated: August 7, 2015 01:13 IST2015-08-07T00:38:00+5:302015-08-07T01:13:20+5:30
स्वामी नारायण चौकात वाहतुकीची कोंडी कायम

स्वामी नारायण चौकात वाहतुकीची कोंडी कायम
पंचवटी : तपोवनातील मुख्य रस्त्यावरची तटबंदी हटवून काही तास होत नाही तोच पोलीस प्रशासनाने आता स्वामी नारायण चौकातील राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावरची वाहतूक दुपारच्या सुमारास अचानक बंद केल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
उड्डाण पुलाखालच्या रस्त्यावरील आडगावकडून द्वारकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्स टाकून रस्ता बंद करून वाहतूक वळविल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. दुपारच्या सुमारास अचानकपणे नवीन आडगाव नाक्याकडून द्वारकाकडे जाणाऱ्या मुख्य महामार्गवरच तटबंदी केली. त्यांचे कारण समजू शकले नाही. मात्र या तटबंदीमुळे आडगावकडून जुन्या आडगाव नाक्याकडे जाणाऱ्या वाहनधारकांची व नागरिकांची गैरसोय झाली. जुना आडगाव नाक्याकडे जाण्यासाठी वाहनधारकांना समांतर रस्त्याने तपोवन क्रासिंगपर्यंत जावे लागले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत रस्ता बंद असला तरी सदरचा रस्ता कोणी बंद करण्यास सागितले, याचे उत्तर पोलिसांकडून न मिळाल्याने नागरिकांच्या संतापात आणखीनच भर पडली. (वार्ताहर)