फेब्रुवारीतील पल्स पोलिओ मोहीम स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:45 IST2019-01-19T00:44:20+5:302019-01-19T00:45:33+5:30

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून दि. ३ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आलेली पल्स पोलिओ मोहीम काही तांत्रिक कारणास्तव स्थगित करण्यात आलेली आहे. केंद्राच्या आरोग्य विभागाकडून या संदर्भात राज्यातील आरोग्य विभागांना या संदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे.

Suspended the Pulse Polio campaign in February | फेब्रुवारीतील पल्स पोलिओ मोहीम स्थगित

फेब्रुवारीतील पल्स पोलिओ मोहीम स्थगित

नाशिक : राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून दि. ३ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आलेली पल्स पोलिओ मोहीम काही तांत्रिक कारणास्तव स्थगित करण्यात आलेली आहे. केंद्राच्या आरोग्य विभागाकडून या संदर्भात राज्यातील आरोग्य विभागांना या संदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच आरोग्य विभागाने दि. ३ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व जिल्हे आणि मनपा हद्दीत पल्प पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या संदर्भातील सूचना सर्व संबंधितांनादेखील देण्यात आल्या होत्या. परंतु आता ही मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे. मोहिमेची अधिकृत तारीख केंद्रीय मंत्रालयाकडून कळविण्यात येणार आहे. तोपर्यंत सदर मोहीम थांबविण्यात आली आहे. मोहीम स्थगित ठेवण्याबाबतचे कारण मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Web Title: Suspended the Pulse Polio campaign in February