शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

निलंबित कर्मचारी तहसीलदाराकडून परस्पर कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 1:29 AM

ग्रामपंचायत निवडणुकीच्या तारखांत घोळ घातल्याच्या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी निलंबित केलेल्या लिपिकास त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदाराने गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सोपविल्यामुळे निलंबित कर्मचाºयाला परस्पर कामावर घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीच्या तारखांत घोळ घातल्याच्या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी निलंबित केलेल्या लिपिकास त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदाराने गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सोपविल्यामुळे निलंबित कर्मचाºयाला परस्पर कामावर घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  तहसीलदाराने काढलेल्या आदेशाला जिल्हा प्रशासनानेही मूक संमती दर्शविल्याची बाब गंभीर मानली जात आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायतीची मुदत संपुष्टात येऊनही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात तारखांचा घोळ घातल्याचा ठपका ठेवून २२ जून रोजी जिल्हाधिकाºयांनी त्र्यंबकेश्वरचे नायब तहसीलदार कनोजे व लिपिक देशमुख यांना निलंबित केले होते. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली होती. निलंबन काळात कनोजे व देशमुख या दोघांचेही मुख्यालय बदलण्यात आले असून, त्यांनी या काळात नुसती मुख्यालयी हजेरी लावणे क्रमप्राप्त असले तरी, मिळालेल्या माहितीनुसार निलंबित दोघांनाही त्र्यंबकेश्वरचा ‘मोह’ सुटलेला नाही. कनोजे यांच्या वरच्यावर त्र्यंबकेश्वरला घिरट्या चालू असतात तर देशमुख यांच्याकडून त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयाचे काम अजूनही करून घेतले जात असल्याचे सर्रारसपणे नजरेस पडते. मुळात निलंबित कर्मचाºयाला त्याच्या निलंबनाच्या काळात शासकीय कामकाज सोपविता येत नाही, तसेच ज्या कार्यालयाने निलंबित केले तेथे हजर राहू दिले जात नाही अशी तरतूद आहे. त्यांना ज्या कारणासाठी निलंबित केले त्याची चौकशी पूर्ण होऊन समितीमार्फतच निलंबन मागे घेतले जाते. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी कनोजे, देशमुख या दोघांचे निलंबन करण्यात येऊन ते अद्यापही कायम असताना नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदारांनी निलंबित कर्मचारी देशमुख यांच्यावर त्र्यंबकेश्वरची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची लेखी जबाबदारी सोपविली. या लेखी आदेशात सोपविलेली जबाबदारी बजावण्यास दिरंगाई केल्यास कारवाई करण्याची तंबीही देशमुख यांना दिली.त्र्यंबकेश्वर तहसीलदारांनी आदेश दिल्यामुळे देशमुख यांनी कर्तव्य पार पाडले असले तरी, अशा प्रकारे आपल्या अधिकारात निलंबित कर्मचाºयाला कायदा व सुव्यस्थेसारखी महत्त्वाची जबाबदारी सोपविता येते काय? असा प्रश्न आता महसूल वर्तुळात विचारला जात आहे. विशेष म्हणजे तहसीलदारांनी बजावलेल्या आदेशाची प्रत थेट जिल्हाधिकाºयांना पाठविण्यात आल्यामुळे निलंबित कर्मचाºयाला कामावर घेण्याच्या या प्रकारास जिल्हा प्रशासनाचीही मूक संमती असल्याचे मानले जात असल्याने नजीकच्या काळात अन्य निलंबित कर्मचाºयांनाही याचा लाभ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदारnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय