मुंबईतील बलात्कार प्रकरणातील संशयित जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 18:18 IST2019-02-22T18:18:26+5:302019-02-22T18:18:42+5:30
ईगतपुरी स्थानकात अटक : रेल्वे सुरक्षा दलाची कामगिरी

मुंबईतील बलात्कार प्रकरणातील संशयित जेरबंद
इगतपुरी : ओशिवरा ,मुंबई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपीला धावत्या रेल्वे गाडीतून अटक करण्यात इगतपुरी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. उत्तरप्रदेशकडे पलायन करणाऱ्या या संशियताला रेल्वे पोलिसांनी ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
गुफरान रईस खान (२५) हा बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी गुरु वारी (दि.२१) गोरखपूर, उत्तप्रदेशकडे जाणा-या रेल्वेने पलायन करणार असल्याची गुप्त माहिती इगतपुरी रेल्वे सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार, त्याला पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी डी. एम.पालवे, विशाल पाटील, तुकाराम आंधळे ,विजय भाबड , विनोद साळवे यांनी गोरखपूरकडे जाणाºया रेल्वे गाड्यांची इगतपुरी रेल्वे स्थानकावर सकाळपासून तपासणी सुरू केली. दरम्यान, गुरूवारी गोरखपूर एक्सप्रेस ही इगतपुरी रेल्वे स्थानकावर आली असता सर्वसाधारण डब्याची तपासणी करताना संशयित गुफरान आढळून आला. त्याला रात्री उशिरा ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय बर्वे यांनी दिली आहे.