शस्र बाळगणारा संशयित पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 00:39 IST2021-03-05T20:16:10+5:302021-03-06T00:39:23+5:30
पिंपळगाव बसवंत : धारदार शस्त्र बाळगणाऱ्या सागर सुदाम कुचेकर (२७) रा.नांदूर शिंगोटे याला पिंपळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शस्र बाळगणारा संशयित पोलिसांच्या जाळ्यात
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पोलीस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सागर सुदाम कुचेकर रा.नांदूर शिंगोटे, मातंगवाडा, ता. सिन्नर हा पिंपळगाव शहरात काहीतरी गुन्हा घडविण्याचा उद्देशाने मोटरसायकलवर धारदार चॉपर घेऊन वावरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने शहरातील भाऊनगर परिसरात गुरुवारी ( दि.४) रात्रीच्या दरम्यान छापा मारत एक चॉपर, दुचाकी व मोबाइल असा एकूण ६२हजारांचा मुद्देमाल हस्तगत करत संशयित सागर सुदाम कुचेकर यास बेड्या ठोकल्या. याबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार रत्नाकर बागुल अधिक तपास करीत आहे.