चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयात अस्तित्व महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 18:58 IST2019-02-10T18:58:13+5:302019-02-10T18:58:36+5:30
चांदवड : येथील स्व. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमबीए विभागातर्फे पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ‘अस्तित्व महोत्सव २०१९’ अंतर्गत राज्यस्तरीय व आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम.डी.कोकाटे होते.

चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयात अस्तित्व महोत्सव
प्रमुख पाहुणे म्हणून समन्वयक दिनेशकुमार लोढा, झुंबरलाल भंडारी, सुनीलकुमार चोपडा आदी उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन टुनवाल ई-व्हेईकलचे वितरक व हरीश आॅटो केअर लासलगावचे संचालक महेश मुंदडा यांच्या हस्ते झाले. पहिल्या दिवशी विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी बॉक्स क्रिकेट, नाट्य स्पर्धा, फूड कॉम्पिटिशन, अंताक्षरी, वन मिनिट शो अशा स्पर्धा झाल्या. दुसऱ्या दिवशी मॉडेलिंग, नृत्य स्पर्धा, प्रश्नमंजुषा व रांगोळी आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सह्याद्री फार्मचे विलास शिंदे यांनी मार्गदर्शन केले. विभागप्रमुख डॉ. ए. आर. बोरा यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्तविक मनोज बरकले यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंचे विक्री प्रदर्शन भरवले होते. या महोत्सवात चांदवड, देवळा, कळवण, सटाणा, मालेगाव, धुळे, शिरपूर, जळगाव, मनमाड, नांदगाव, लासलगाव, अभोणा येथील ८०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.