शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

विल्होळी गावातील भूमापनाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:55 AM

विल्होळी व परिसरातील गावठाणाचे सर्व्हे आॅफ इंडियामार्फत ड्रोनद्वारे येत्या आठ दिवसांच्या आत सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्याद्वारे गावाचा नकाशा तयार करून तो ग्रामपंचायतीच्या मिळकत रजिस्टरला जोडण्यात येईल.

विल्होळी : विल्होळी व परिसरातील गावठाणाचे सर्व्हे आॅफ इंडियामार्फत ड्रोनद्वारे येत्या आठ दिवसांच्या आत सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्याद्वारे गावाचा नकाशा तयार करून तो ग्रामपंचायतीच्या मिळकत रजिस्टरला जोडण्यात येईल. ग्रामस्थांना मिळकत पत्रिका व सनद भूमिअभिलेख विभागामार्फत देण्यात येणार असल्याची माहिती भूमिअभिलेख विभागातर्फे देण्यात आली आहे.ग्रामस्थांना या सर्वेक्षणाची माहिती देण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी गावठाण भूमापन महत्त्व व फायदे ड्रोन सर्व्हे, ड्रोनद्वारे भूमापन याविषयी भूमिलेख विभागाचे अधीक्षक विजय संधानशिव व भास्कर राऊत यांनी मार्गदर्शन केले. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाजीराव गायकवाड होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी बळीराम पगार, रामजी थोरात, सोमनाथ भावनाथ, संपत बोंबले, पोलीसपाटील संजय चव्हाण, धोंडीराम थोरात, जानकाबाई चव्हाण, शोभा वाघ, सुरेश भावनाथ, मनोहर भावनाथ, पुंडलिक सहाने, सूर्यभान बोराडे, मोतीराम भावनाथ, बाजीराव मते, गंगाराम चव्हाण, सुदाम थोरात, पोपट निंबेकर, झुंबर बेंडकोळी, काशीनाथ मते आदीं ग्रामस्थ उपस्थित होते.सर्वेक्षणाने होतील फायदेशासनाच्या मालकीच्या मिळकतींचे संरक्षण होईल.मिळकतींचा नकाशा तयार होईल व सीमा निश्चित होतील.मिळकतीचे नेमके क्षेत्र माहीत होईल.मालकी हक्काच्या अभिलेख मिळकत पत्रिका तयार होईल.ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संरक्षण होईल.गावातील रस्ते ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सीमा निश्चित होतील.मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे घरांवर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल.मिळकतींना बाजारपेठांमध्ये तरलता येऊन गावाची आर्थिक पत उंचावेल.ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल.सर्व कार्यपद्धती पारदर्शकपणे राबविली जाईल.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNashikनाशिक