शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

सूर-तालाचे उमटले आनंद तरंग...

By admin | Updated: September 27, 2014 00:19 IST

स्वरवंदना : सतारवादनाची मैफल रंगली

नाशिक : सतारीचे सूर आणि तबलावादनातून घुमलेले तालस्वर यांचा सुरेख मिलाफ घडविणारी मैफल कुसुमाग्रज स्मारकात रसिकांनी अनुभवली आणि आनंद तरंग निर्माण करणाऱ्या या मैफलीतून शिष्यांनीही गुरूंप्रती कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला. उस्ताद शाहीद परवेझ संगीत गुरुकुल आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने ‘स्वरवंदना’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. सौ. उमा निशाणदार यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या सतारवादनाने प्रारंभ झाला. सुमंत मंजुनाथ, डॉ. स्मिता कापडणीस, सुनीता देशपांडे, नीलिमा कुलकर्णी, सुजाता मंजुनाथ, डॉ. स्वाती शहा, डॉ. गीताली भट, ज्योती डोखळे, शर्मिला जोशी यांनी सतारवर राग वृंदावनी सारंग सादर करत उपस्थितांकडून दाद मिळविली. त्यानंतर पूनम गारे यांनी राग यमन सादर केला. डॉ. उद्धव आष्टुरकर यांचे शिष्य प्रसाद रहाणे यांनीही सतारवादन शैलीचे दर्शन घडवित मंत्रमुग्ध केले. उमा निशाणदार यांनी राग बागेश्री पेश केला. त्यानंतर पंडित आनंद चॅटर्जी यांचे शिष्य मकरंद तुळाणकर यांचे सोलो तबलावादन झाले. त्यांना साथसंगत प्रशांत महाबळ (संवादिनी), सुजित काळे व गौरव तांबे (तबला) यांनी केली. शेवटी विनया फणसाळकर यांचे सतारवादन झाले. त्यांना तबलासाथ प्रदीप फणसाळकर यांनी केली. सूत्रसंचालन सुप्रिया फणसाळकर यांनी केले. प्रारंभी ज्येष्ठ तबलावादक जयंत नाईक व मकरंद तुळाणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी उस्ताद शाहीद परवेझ संगीत गुरुकुलचे अध्यक्ष डॉ. उद्धव आष्टुरकर, सचिव राधिका गोडबोले, उपाध्यक्ष उमा निशाणदार, मोहिनी कुलकर्णी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)