शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

अडीच दशकांच्या सत्तेला सुरुंग?

By admin | Updated: September 16, 2014 00:07 IST

अडीच दशकांच्या सत्तेला सुरुंग?

 गेल्या पंचवीस वर्षांपासून देवळालीत एकहाती सत्ता आणण्याचे काम बबनराव शंकरराव घोेलप आणि शिवसेनेने केलेले असताना, यंदा पहिल्यांदाच न्यायालयाच्या एका फटकाऱ्यासरशी दोन्हींची सत्ता होत्याची नव्हती होण्याची शक्यता आहे. देवळाली तसे पाहता १९९५ पासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला बनून राहिला आहे. मध्यंतरीच्या एका निवडणुकीत ए.बी. फॉर्मचा घोळ सोडला, तर देवळालीत अनुसूचित जाती संवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून सातत्याने शिवसेना आणि आमदार बबनराव घोेलप निवडून येत असल्याचे समीकरण जुळले आहे. यंदा मात्र त्यात फार मोठी उलटफेर होण्याची चिन्हे न्यायालयाच्या एका निकालाने केली आहेत. आमदार बबनराव घोलप यांना न्यायालयाने अवैध संपत्तीच्या प्रकरणात निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे देवळालीत शिवसेनेतील अन्य इच्छुकांना धुमारे फुटले आहेत, तर राष्ट्रवादीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. घोलपच समोर नसतील तर विजय पक्का हे समीकरण जुळवित राष्ट्रवादीतील इच्छुकांची संख्या वाढली आहे. आघाडी आणि युती झालीच तर हा मतदारसंघ आघाडीकडून राष्ट्रवादीच्या पारड्यात व युतीकडून अर्थातच सेनेच्या पारड्यात जाणार आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना मिळालेली आघाडीही लक्षणीय मानली जाते. तसेही देवळाली सेनेचा बालेकिल्ला असूनही येथून सचिन ठाकरे व हेमंत गोडसेंच्या रूपाने मनसेचे अस्तित्व बऱ्यापैकी निर्माण झालेले असतानाच हेमंत गोडसे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवबंधन बांधून लोकसभेत भगवा फडकविल्याने तर देवळालीत बऱ्यापैकी भगवे वारे वाहू लागले आहेत. त्यातच नुकत्याच झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत उपसभापतिपदी अनिल ढिकले यांची निवड ही जशी सेनेच्या दृष्टीने प्रतिष्ठा वाढविणारी तशी मनसे आणि कॉँग्रेसच्या दृष्टीने ती प्रतिष्ठा घालविणारी ठरली आहे. देवळालीत असलेल्या शहरालगतच्या ४० खेड्यांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी अशीच लढत असली, तरी आता अनिल ढिकले, प्रकाश बदादे यांच्यासारख्या कॉँग्रेसजनांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेची बाजू भक्कम, तर राष्ट्रवादीची लंगडी पडली आहे. मात्र त्यातही पश्चिम पट्ट्यातील एकगठ्ठा आदिवासी मतदान असलेला व सेनेच्या पट्ट्यातील नाते-गोत्याचे संबंध असलेल्या नितीन मोहितेसारख्या कॉँग्रेसच्या उमेदवाराला राष्ट्रवादीकडून उमेदवारीचे बूस्टर मिळाल्यास घोलप नसल्याने काहीही घडू शकते. तूर्तास सर्व वेट अ‍ॅन्ड वॉचच्या भूमिकेत आहे.