शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांवर खुद्द नारायण राणेंचे उत्तर, म्हणाले- "जर माझ्या पदाचा..."
2
"युतीसाठी मी ५० मिनिटे भाजपा कार्यालयात ताटकळत बसलो, पण शेवटी..."; प्रताप सरनाईकांचा आरोप
3
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला, खिडक्यांची तोडफोड, एकाला अटक!
4
आमदारांनी लावली कुटुंबातील सदस्यांची बिनविरोध वर्णी?; 'सेटलमेंट-अ‍ॅडजस्टमेंट'चे राजकारण
5
आंध्र प्रदेशात ONGC पाइपलाइनमधून गॅसगळतीनंतर भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण
6
मीरा भाईंदरमध्ये आठवडा होत आला तरीही उमेदवारांची शपथपत्रेच 'अपलोड' केलेली नाहीत
7
भाजप निवडणूक आयोगाला खिशात घेऊन फिरतंय का? बिनविरोध निवडीवरून नाना पटोलेंचा घणाघात!
8
‘५ लाख द्या, नाहीतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करेन’, ड्रायव्हरची मालकिणीला धमकी, त्यानंतर...  
9
नवनीत राणांनी अजित पवारांना दिलेल्या 'त्या' सल्ल्यावर खोडके बरसले; म्हणाले 'औकातीत राहून बोलायला शिका'
10
व्हेनेझुएलावर अचानक हल्ला करून अमेरिकेचा चीन-रशियाला मोठा इशारा; भारतावर काय होणार परिणाम?
11
छाप्यानंतर सुरू व्हायचा 'खेळ', CGST डेप्युटी कमिशनर प्रभा भंडारीच्या घरीच व्हायची 'ती' डील
12
'जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत लाडक्या बहिणींचा निधी बंद होणार नाही'- देवेंद्र फडणवीस
13
मणिपूर हादरले! पहाटेच्या वेळी तीन शक्तिशाली IED स्फोट, सुरक्षा यंत्रणांनाही धक्का, दोन जखमी
14
"फटाके फोडणारे देशद्रोही आहेत, भारतात फटाक्यांवर बंदी घाला"; भाजपा नेत्या मनेका गांधी भडकल्या
15
व्हेनेझुएलावर झालेल्या हल्ल्यादरम्यान आमचे ३२ नागरिक मारले गेले, या देशाचा अमेरिकेवर आरोप
16
सावधान! तोतया पोलीस अधिकारी आणि कुरिअरचा सापळा; ८१ वर्षीय व्यावसायिकाला ७ कोटींचा चुना
17
"जे झालं ते चुकीचं! बांगलादेश संघाने भारतात यायचं की नाही ते..." हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला?
18
निकोलस मादुरो या भारतीय बाबाचे आहेत भक्त; त्यांच्या कार्यालयातील भींतीवरही भला मोठा फोटो
19
"सर लवकर या, माझ्या वडिलांना हे मारून टाकतील"; बाप-लेकाला भररस्त्यात अमानुष मारहाण
20
"इतिहास सांगेल गद्दार कोण!" निकोलस मादुरो यांचा मुलगा संतापला, अमेरिकेला दिलं चॅलेंज!
Daily Top 2Weekly Top 5

खैरे सरांच्या पदयात्रेस संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा ; औरंगाबाद ते मंत्रालय आंदोलनाचा तेरावा दिवस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 17:30 IST

विनाअनुदानित शिक्षकांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान मिळावे या मागणीसाठी गजानन खैरे या शिक्षकाने अन्नत्याग करून औरंगाबाद ते मंत्रालय असा पायी प्रवास सुरू केला आहे.  त्यांची पदयात्रा नाशिकमध्ये दाखल झाली असून याठिकाणी शनिवारी (दि.८) संभाजी बिगेडतर्फे त्यांचे स्वागत करून त्यांच्या पायी आंदोलनास पाठींबा देण्यात आला.

ठळक मुद्दे गजानन खैरे यांची औरंगाबाद येथून अन्यत्याग करून पदयात्रा शिक्षकांना प्रचलित नियमांनुसार अनुदानाची मागणी औरंगाबाद ते मंत्रालय असा पायी प्रवास

नाशिक : विनाअनुदानित शिक्षकांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान मिळावे या मागणीसाठी गजानन खैरे या शिक्षकाने अन्नत्याग करून औरंगाबाद ते मंत्रालय असा पायी प्रवास सुरू केला आहे.  त्यांची पदयात्रा नाशिकमध्ये दाखल झाली असून याठिकाणी शनिवारी (दि.८) संभाजी बिगेडतर्फे त्यांचे स्वागत करून त्यांच्या पायी आंदोलनास पाठींबा देण्यात आला. विनाअनुदानित  शिक्षकांना प्रचलित नियमांनुसार अनुदान मिळावे यासाठी नवयुग क्रांती शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन खैरे यांनी औरंगाबाद येथील क्रांती चौकातून अन्यत्याग करून औरंगाबाद ते मंत्रालयापर्यंत पायी प्रवास आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यांच्या समवेत औरंगाबाद येथून वंसत पानसरे, अनिश कुरेशी , अमोल निकम, कमलेश राजपूत आदी शिक्षक या पदयात्रेत सहभागी झाले असून बारा दिवसांचा प्रवास करून त्यांची पदयात्रा  शुक्रवारी नाशिकमध्ये दाखल झाली. नाशिकमध्ये  मुक्कामानंतर त्यांची पदयात्रा पुन्हा मुबईच्या दिशेने मार्गस्थ झाली असून येथील प्रा. करतारसिंह ठाकूर, निलेश गांगुर्डे व संस्थाचालक प्रतिनिधी  विजय काळे आदींनीही या पदयात्रेत सहभाग घेत मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे. दरम्यान, विना अनुदानित शिक्षक संघास संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने पाठिंबा देण्यात आला असून यावेळी संघटनेचे जिल्हा सचिव नितीन रोठे पाटील, शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ, विक्रम गायधनी, बापू मूरकुटे,राजेंद्र शेळके, विकी ढोले, राहुल तिडके लकी बाविस्कर, गणेश सहाणे, प्रथमेश पाटील, सनी ठाकरे, भैया सैंदाणे,  संविधान गायकवाड, योगेश कापसे, राहुल लोखंडे, किरण निकम ताराचंद मोतमल आदी उपस्थित होते.     

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकTeacherशिक्षकagitationआंदोलन