दहावी, बारावीच्या अनुत्तीर्णांसाठी १७ जुलैपासून पुरवणी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 17:41 IST2019-07-01T17:37:16+5:302019-07-01T17:41:00+5:30

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व  उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा १७ ते ३० जुलैदरम्यान तर १७ जुलै तर ३ आॅगस्टदरम्यान बारावी आणि १७ ते ३१ जुलैदरम्यान बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थांना विलंब शुल्कासह अर्ज करण्याची संधी संपली असली तरी विद्यार्थ्यांना अतिविलंब, विशेष अतिविलंब आणि अतिविशेष अतिविलंब शुल्क भरून परीक्षेच्या एक दिवस अगोदर म्हणजेच १६ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. 

The supplementary examination will be held from July 17 for the students of Class X and XII | दहावी, बारावीच्या अनुत्तीर्णांसाठी १७ जुलैपासून पुरवणी परीक्षा

दहावी, बारावीच्या अनुत्तीर्णांसाठी १७ जुलैपासून पुरवणी परीक्षा

ठळक मुद्दे17 जुलैपासून दहावी ,बारावीची पुरवणी परीक्षाविद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासोबतच गुणवत्ता सुधारण्याची संधी

नाशिक : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व  उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा १७ ते ३० जुलैदरम्यान तर १७ जुलै तर ३ आॅगस्टदरम्यान बारावी आणि १७ ते ३१ जुलैदरम्यान बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थांना विलंब शुल्कासह अर्ज करण्याची संधी संपली असली तरी विद्यार्थ्यांना अतिविलंब, विशेष अतिविलंब आणि अतिविशेष अतिविलंब शुल्क भरून परीक्षेच्या एक दिवस अगोदर म्हणजेच १६ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. 
पुरवणी परीक्षेसाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना १६ जुलैपर्यंत मंडळाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यात नियमित अंतिम मुदत २४ जून व विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत २७ जूनला संपुष्टात आली असून, अतिविलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत सोमवार, दि. १ जुलै रोजी संपली आहे. आता विद्यार्थ्यांना विशेष अतिविलंब शुल्कासह ८ ते १२ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रतिदिन १०० रुपये विलंब शुल्क भरावे लागणार असून, त्यानंतरही अतिविशेष अतिविलंब शुल्कासह थेट परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. परंतु त्यासाठी प्र्रतिदिन २०० रुपये विलंब शुल्क भरावे लागणार आहे. दोन्ही वर्गांच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा ९ ते १६ जुलैदरम्यान घेण्यात येणार आहेत. यापूर्वी नाशिक विभागातून १ लाख ५९ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यातील १ लाख ३५ हजार ५५० विद्यार्थी उत्तीर्ण, तर २४ हजार ३०९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. दहावीच्या १ लाख ८९ हजार ७५० पैकी १ लाख ५४ हजार १९३ विद्यार्थी उत्तीर्ण, तर ३५ हजार ५५७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. दोन्ही मिळून ५९ हजार ८६६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून, त्यांना पुरवणी परीक्षा देण्याची संधी आहे. याशिवाय उत्तीर्ण झालेले मात्र श्रेणी सुधार करू इच्छिणाºया विद्यार्थ्यांनाही परीक्षेला प्रविष्ट होता येणार आहे. 

Web Title: The supplementary examination will be held from July 17 for the students of Class X and XII