Sunsuna went on Sunday | रविवार गेला सुनासुना

रविवार गेला सुनासुना

ठळक मुद्देकोरोनाची धास्ती : गोदाकाठ, मेनरोडला तुरळक गर्दी;रस्ते पडले ओस

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध घालण्यात आल्याने नेहमी गजबजणारे शहर रविवार सुटीचा दिवस असूनही सुनेसुने वाटत होते. गर्दीच्या ठिकाणांवर प्रशासनाने निर्बंध आणल्यामुळे शहरात तुरळक गर्दी दिसून आली. मॉल्स आणि चित्रपटगृहे बंद करण्यात आल्यामुळे नाशिककरांनी रविवारी घरी राहणेच पसंत केले. शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या असल्यातरी मुलांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाऊ नये, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्याने पालकांनीही मुलांना बाहेर आणणे टाळले. बंदच्या आदेशामुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला, तर दैनंदिन आर्थिक व्यवहारांवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.

Web Title: Sunsuna went on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.