शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

सुनील खोडे वाहन तोडफोडीचे प्रमुख सूत्रधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:39 AM

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३० मधील इंदिरानगरचे भाजपाचे नगरसेवक सतीश सोनवणे व दीपाली कुलकर्णी यांच्या चारचाकी वाहनांची तोडफोड ही भाजपाचे माजी नगसेवक व विद्यमान नगरसेवकाचे पती सुनील खोडे यांनीच घडविल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ भाजपा नगरसेवकांतील अंतर्गत गटबाजी व विकासकामांच्या श्रेयवादातून हा प्रकार केल्याचे समोर आले

इंदिरानगर : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३० मधील इंदिरानगरचे भाजपाचे नगरसेवक सतीश सोनवणे व दीपाली कुलकर्णी यांच्या चारचाकी वाहनांची तोडफोड ही भाजपाचे माजी नगसेवक व विद्यमान नगरसेवकाचे पती सुनील खोडे यांनीच घडविल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ भाजपा नगरसेवकांतील अंतर्गत गटबाजी व विकासकामांच्या श्रेयवादातून हा प्रकार केल्याचे समोर आले असून, पोलिसांनी शुक्रवारी (दि़ १३) सकाळी खोडे यांना अटक केली व त्वरित जामीनही मंजूर केला़ दरम्यान, खोडे यांची भाजपातून हकालपट्टी करण्याची मागणी नगरसेवक सोनवणे व कुलकर्णी यांनी केली आहे़  राजीवनगरमधील रहिवासी तथा प्रभाग क्रमांक ३० चे नगरसेवक सतीश सोनवणे यांच्या घराबाहेर उभी असलेल्या इनोव्हा कारचे (एमएच १५ डीवाय ६३६०) तसेच रथचक्र चौकातील साईश्रद्धा अपार्टमेंटमधील रहिवासी नगरसेवक दीपाली कुलकर्णी याच्या वोक्सवॅगन वेन्टो (एमएच १५ ईएक्स ६६५५) कारचे गुरुवार, दि़ ५ एप्रिल रोजी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास चार समाजकंटकांनी काचा फोडून नुकसान केले़ दोन दुचाकींवरून आलेल्या या चार समाजकंटकांनी तोंडाला रुमाल बांधलेले होते तसेच त्यांच्या हातात लाकडी दांडके होते़ या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या समाजकंटकांचे कृत्य परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. फुटेजच्या तपासानंतर संशयित पांडवनगरी परिसरातील असल्याचे समोर आले होते. इंदिरानगर पोलिसांनी वाहन तोडफोडीतील संशयित ओमकार मैंद याच्यासह दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले़ मात्र, त्यांचा म्होरक्या प्रीतम ऊर्फ डॅनी प्रकाश गोडसे (रा. पांडवनगरी) हा फरार होता़ त्यास बुधवारी (दि. ११) रात्री अटक केल्यानंतर केलेल्या चौकशीत भाजपाचेच माजी नगरसेवक सुनील खोडे यांनी वाहनांची तोडफोड करण्यासाठी सांगितल्याचे पोलिसांना सांगितले़ पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी बाहेरगावी असल्याचे सांगितले़ मात्र शुक्रवारी (दि़ १३) सकाळी ८ वाजताच इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झाले़सोशल मीडियामध्येही खोडेंवर संशयवाहनांच्या तोडफोडीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर त्यामध्ये संशयित प्रीतम गोडसे हा स्पष्टपणे वाहनांची तोडफोड करीत असल्याचे दिसत होते़ गोडसे हा नेहमी खोडे यांच्यासोबत राहत असल्याने त्यांनीच हा प्रकार घडवून आणला असावा असे मत व्यक्त होत होते़ दरम्यान, वाहनांचे नुकसान झालेल्या नगरसेवकांनीही मुख्य सूत्रधाराला पकडण्याची मागणी केली होती़ खोडे यांचा यामध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने पक्षाने त्यांची हकालपट्टीची मागणी या दोघा नगरसेवकांनी केली आहे़

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस