शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

सुंदरनारायण : पहिला टप्पा जानेवारीत पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:00 AM

नाशिकच्या पुरातन आणि वारसा मंदिरांमध्ये श्री सुंदरनारायण मंदिराचा प्रामुख्याने समावेश आहे. मात्र, कालौघात या मंदिराची काहीशी झीज झाल्याने आता केंद्र सरकारच्या निधीतून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या कामाला पावसाळ्यानंतर पुन्हा प्रारंभ करण्यात आला आहे.

नाशिक : नाशिकच्या पुरातन आणि वारसा मंदिरांमध्ये श्री सुंदरनारायण मंदिराचा प्रामुख्याने समावेश आहे.मात्र, कालौघात या मंदिराची काहीशी झीज झाल्याने आता केंद्र सरकारच्या निधीतून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्याकामाला पावसाळ्यानंतर पुन्हा प्रारंभ करण्यात आला आहे. सध्या मंदिराच्या चौथ्या स्तराचे काम सुरू असून, नूतन वर्षापर्यंत सोळा स्तरांचे कामकाज पूर्ण केले जाईल, असा दावा पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विराग सोनटक्के यांनी केला आहे.नाशिकमधील अनेक पुरातन मंदिरांनी वैशिष्ट्यपूर्ण बांधणीमुळे वेगळेपण जपले आहे. श्री सुंदरनारायण मंदिर हे त्यापैकीच एक असून, नाशिकच्या या ऐतिहासिक ठेव्याचे जतन होण्यासाठी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या कामास तीन वर्षांपूर्वीच प्रारंभ झाला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यासाठी ४.५, तर उर्वरित दोन टप्प्यांसाठी प्रत्येकी चार याप्रमाणे केंद्र सरकारकडून १२.५ कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील कामकाज सध्या सुरू आहे. या पहिल्या टप्प्यात अधिक झीज झालेले आणि निखळू पाहणाऱ्या मंदिराच्या पश्चिम आणि उत्तरेकडील भागाचे काम हाती घेण्यात आले आहे.पुरातन वास्तू असलेल्या येथील सुंदरनारायण मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व विभागाच्या सहकार्याने सुरू आहे. शास्त्रीय पद्धतीने काम सुरू असल्याने तसेच काम जसे वरच्या भागात केले जाते, तशी आसपासची जागा कमी उपलब्ध होत असल्याने कामाला अधिक प्रमाणात वेळ लागत असल्याचे पुरातत्व विभागाने स्पष्ट केले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे पाच महिने बंद असलेल्या या कामाला गत आठवड्यात पुन्हा प्रारंभ करण्यात आला आहे. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन २०१७ साली सुरु वात झाली. या कामासाठी पुरातत्व विभागास प्रारंभी दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. त्यातील निम्म्याहून अधिक कालावधी विद्युत मंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अपेक्षित कामांची पूर्तता होण्यातच व्यतित झाला. तसेच गतवर्षातील पावसाळा आणि यंदाचा पावसाळा असा सुमारे दीड वर्षांहून अधिक कालावधी वाया गेल्यानंतर पहिल्या टप्प्याचे कामकाज सुरू झाले.दोन टप्पे बाकीमंदिराच्या पश्चिमेकडील मंडपाचे कामदेखील मंदिराच्या दुसºया टप्प्याच्या कामात निर्धारित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे, तर त्या कामाच्या पूर्ततेनंतर मुख्य मंडप आणि आवार या तिसºया टप्प्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर २०२० मध्येच पुढील टप्प्याच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे आणखीन काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.पावणेतीनशे वर्ष जुने मंदिरसंपूर्ण काळ्या पाषाणात दगड, चुना, शिसव, नवसागरचा वापर करून हे मंदिर १७५६ साली बांधण्यात आले आहे. कालौघात पर्यावरणातील काही बदलामुळे काही मंदिरांची झीज खूप वेगाने सुरू झाली होती. झीज आणि अन्य कारणाने धोकादायक स्थितीत पोहोचल्याने पुरातत्व विभागाच्या वतीने मंदिराच्या जीर्णोद्धार कामालाप्रारंभ करण्यात आलाआहे.नागरशैलीतील मंदिरगर्भगृह, अंतराळ, सभामंडप अशी रचना असलेले हे मंदिर नागरशैलीतील आहे. या मूळ मंदिरात हिंदू स्थापत्य कला आणि मुस्लीम स्थापत्य कलेचा संमिश्र प्रकार पहायला मिळतो. यादवांच्या काळात किंवा हेमाडपंती शैलीमुळे मंदिराच्या बांधकामात केवळ पाषाणाचाच वापर होत असल्याने पेशवे काळात सिमेंट, चुना आणि वीट या वस्तुंचा वापर झाल्याचे आढळते. गर्भगृहाच्या मागील भागाने पायापासून तर शिरापर्यंत बघितल्यास खालून वर निमुळते होत जाणारे आहे. गर्भगृहावर चार मुक्त दिशांना शिखराच्या प्रतिकृती आहेत. त्यावर कलश असून सभामंडपाचे छत संवर्णा पद्धतीचे आहे.कुशल कारागिरांची भासते वानवासुंदरनारायण मंदिराची बांधणी पाषाणात आहे. महाराष्ट्रात अशी पाषणातील मंदिरांची संख्या कमी आहे. दक्षिणेकडे अशीच मंदिरे असल्याने या मंदिराच्या बांधकामासाठी कारागीर दक्षिणेतून आले आहेत. त्यांना या मंदिर बांधकामाचा सराव असल्याने कौशल्यपूर्ण पद्धतीने केलेल्या कामाला योग्य जागी बसवत पुन्हा नवीन दगडाच्या जुळणीचे काम सुरू आहे. मात्र, या पद्धतीच्या कामाचा अनुभव असलेल्या कुशल कारागिरांची वानवा जाणवते.४पुरातत्व विभागाला अडथळ्यांची शर्यत पार करत काम करावे लागत आहे. सुरु वातीला प्रत्यक्ष कामास सुरु वात झाली, तेव्हा या ठिकाणी विद्युत वितरणच्या रोहित्रामुळे काम रखडले. नंतरच्या काळात मंदिर बांधण्यासाठी वापरण्यात येणाºया दगडावरून काही वाद झाले. सर्व विभागांशी निगडीत वाद संपुष्टात आल्यानंतर कामकाजाला प्रारंभ करण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकTempleमंदिर