शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

जिल्ह्यात कांद्याला उन्हाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 9:50 PM

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी व मार्च महिन्याच्या सुरुवातीला उन्हाच्या तीव्रतेमुळे कांदा पिकाला तडाखा बसत आहे. उन्हाच्या ...

ठळक मुद्देआवकेत वाढ, दरात घट : उष्णतेमुळे नवीन कांदा लवकर होतोय परिपक्व

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी व मार्च महिन्याच्या सुरुवातीला उन्हाच्या तीव्रतेमुळे कांदा पिकाला तडाखा बसत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे कांदे लवकर परिपक्व होऊ लागल्याने वणी व दिंडोरी बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू होऊ लागली आहे. परिणामी दरात घट होण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.सध्या उन्हाळी कांद्याचा हंगाम सुरू झाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने त्याचा परिणाम कांदा पिकावर झाल्याने कांदा पक्का झाला. परिणामी घाऊक बाजारात कांद्याच्या दरात घट झाल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.१ मार्च २०२१ ते १० मार्च या कालावधीत विक्रमी वाहनांची आवक१) जिल्हा परिषद वाहने :- १०६० कांदा वाहतुकीसाठी वापरात आली.२) ट्रॅक्टर :- १४२१ ,कांदा वाहतुकीसाठी वापरात आले.दि. १ ते १० मार्चपर्यंत वणी व दिंडोरीत आवक व भावलाल कांदा आवक :- १३००० क्विंटल. (भाव ८०० ते २८६१ रुपये)उन्हाळी कांदा:-२१५०० क्विंटल (९०० ते २८६० रुपये)गोल्टी कांदा (२०० ते २५०० रुपये)एकूण आवक :- ३४५०० क्विंटलकांद्याची आवक दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असून अत्यंत मेहनत करून, अतिशय महागडी औषधे खरेदी करूनही भाव मिळत नसेल तर विविध बँक, सोसायटी, पतसंस्थांचे कर्ज फेडायचे कसे अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.येवला तालुक्यात पिके कोमेजलीमानोरी : एकीकडे कांद्याच्या दरात घसरण, दुसरीकडे पालखेड आवर्तनाकडे नजरा तर तिसरीकडे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने येवला तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच त्रेधा उडाली आहे. येवल्याच्या पश्चिम भागात विहिरींनी तळ गाठल्याने कांद्यासाठी पाणीच राहत नसल्याने वाढत्या उष्णतेमुळे कांद्याची पिके कोमेजू लागली आहेत. काही ठिकाणी पाणी आहे असून थकीत वीज बिलामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. सरकारने वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश मागे घेण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.उन्हाळी आणि लाल कांदा लागवडीत मोठ्या प्रमाणात विक्रमी वाढ झाली असून यंदा अवकाळी पावसामुळे रोपांचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी वर्गाने मिळेल तेथून कांद्याची रोपे विकत घेऊन कांद्याची लागवड पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कांद्याच्या बियाणांमध्ये फसगत झाल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.दरम्यान, कांद्याच्या दरात सातत्याने मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याने उन्हाळी आणि लाल कांदा काढणीला वेग आला असून कांद्याचे दर अजून किती कमी होतील याची शाश्वती नसल्याने बाजार समित्यांत कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीला येत असून आवक दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याचे दिसून येत आहे.उष्णता दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. उन्हाळी कांद्याला देण्यासाठी मुबलक पाणी विहिरीत येत नसल्याने शेतकरी वर्गाकडून पालखेड आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. उन्हाळी कांद्याला अद्यापही चार ते पाच पाणी मुबलक प्रमाणात देणे गरजेचे असून पालखेड आवर्तनातून वितरीका क्र. २१ , २५ व २८ ला आवर्तन तत्काळ सोडण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.विहिरींनी तळ गाठल्यानंतर कांद्याला पाणी भरण्यासाठी तारेवरची कसरत शेतकरी वर्गाला करावी लागत असतानाच अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने स्थगित केलेली वीज पुरवठा खंडितचा आदेश मागे घेत पुन्हा थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश दिल्यानंतर शेतकरी वर्गाकडून या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वीजपुरवठा खंडित करून शेतकरी वर्गाची बोळवण होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा