शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

उन्हाळी कांदा साठवणुकीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 17:51 IST

खामखेडा : खामखेडा परिसरात उन्हाळ कांदा साठवणूकीकरीता शेतकरी धावपळ करीत आहे. सध्या कसमादे भागात कांदा चांगला पिकला आहे. गेल्या ...

ठळक मुद्दे भाव नसल्याने तो चाळीत ठेवत आहे.

खामखेडा : खामखेडा परिसरात उन्हाळ कांदा साठवणूकीकरीता शेतकरी धावपळ करीत आहे. सध्या कसमादे भागात कांदा चांगला पिकला आहे. गेल्या तीन-चार वर्षापासून गरपीट, अवकाळी पाऊस व ह्या वर्षी दुष्काळाच्या दुष्टचक्र मागे लागलेले असतांना या सर्व संकटावर मात करु न कसा बसा कांदा पिकवला. आणि हाच कांदा आता बाजारात पाचशे ते आठशे भावात विकला जातो आहे. त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. कांद्याचे चांगले उत्पादन मिळाले असुन बाजारभाव मिळत नसल्याने कांदा साठवणुक केल्याशिवाय पर्याय नाही.गेल्या वर्षी उन्हाळी कांद्याचे भरपूर प्रमाणात उत्पादन झाल्याने तेव्हा कांदा काढणीच्या वेळेस आज ज्या भावात कांदा विकला जात आहे.त्याचं भावात गेल्या वर्षी विकला जात होता, तेव्हा पुढे भाव वाढ होईल या आशेवर शेतकऱ्याने चाळीत कांदा साठवणूक केली होती. परंतु पूर्ण वर्षभर कांद्याच्या भावात वाढ झाली नाही. कांद्याच्या भावात वाढ होईल या आशेवर नोव्हेंबर मिहन्यापर्यत ठेवला परंतु भाव वाढला नाही. तेव्हा कांदा चाळीत सडला. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली. हा कांदा चाळीतून काढून उकिरड्यावर फेकावा लागला. तरीही या वर्षी मोठ्या हिमतीने शेतकºयाने कांद्याची लागवड केली आहे. या कांदापिकासाठी उधार, उसनवर पैसे आणून उन्हाळी कांद्याची लागवड केली आहे. परंतु पाहिजे तसा भाव नसल्याने तो चाळीत ठेवत आहे.या वर्षी चांगल्या वातावरणामुळे अल्पसा पाऊस असुनही शेतकरी वर्गाला कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर साधले आहे. मात्र उत्पादन खर्च हजार रु पये एकरी असतांना कांद्याला मिळत असलेल्या सरासरी पाचशे ते आठशे रु पये बाजार भावामुळे शेतकरी वर्ग कांदा साठवणुकीस जोर देऊ लागला आहे. मातीमोल दरात कांदा देण्यापेक्षा शेतकरी साठवण करण्यास अधिक पसंती देत असल्याने सध्या खामखेडा परिसरात कांदा साठवणूक करतानाचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.देवळा तालुक्यातील गावांना सलग चार वर्षांपासून नैसर्गिक संकटाने ग्रासले आहे. गारपीट, अवकाळी पाऊस व आता पाणीटंचाईमुळे उन्हाळी कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने कांदा पिकास फटका बसला आहे.गिरणा परिसरातील खामखेड, भऊर, बगडू, पिळकोस, बेज, भादवण, विसापूर या परिसरामध्ये उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. दरवर्षी सर्वसाधारण शेतकरी दोनशे ते तीनशे क्विंटल कांद्याची चाळीत साठवणूक करत होता. मात्र ह्या वर्षी अल्पश्या पावसावर लागवड केलेल्या कांद्यास अल्प बाजार भाव मिळत असल्याने शेतकरीवर्गाने कांदा साठवणुकीवर भर दिली आहे.या वर्षी कांदा पिकास पोषक वातवरण असल्याने शेतकरी वर्गास अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न साधल्याने साठवणुकीची क्षमते पेक्षा अधिक उत्त्पन मिळाल्याने तशेच सध्या कांद्यास सरासरी चारशे ते सातशे रु पयापर्यंत बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी कांदा साठवणूकीवर भर देऊ लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकी साठी कायम स्वरूपी केलेल्या सोयी कांदा चाळी भरून गेल्याने खामखेडा, भऊर, सावकी, विठेवाडी परिसरात तात्पुरते कुड व अन्य सोयी उभारून कांदा साठवण्याची तयारी करीत आहे.