येवल्यात उन्हाळ कांदा आवक टिकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:42 IST2020-11-21T21:52:40+5:302020-11-22T01:42:48+5:30
येवला : सप्ताहात येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्यांत मागणी चांगली होती.

येवल्यात उन्हाळ कांदा आवक टिकून
येवला : सप्ताहात येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्यांत मागणी चांगली होती. सप्ताहात एकूण कांदा आवक १४,९२१ क्विंटल झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान रु. १८०० ते कमाल रु. ४९०१ तर सरासरी रु. ३८०० प्रतिक्विंटलपर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक २९८३ क्विंटल झाली असून, कांद्याचे बाजारभाव किमान रु. १२०० ते कमाल रु. ४६५०, तर सरासरी ४००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. सप्ताहात गव्हाची आवक टिकून होती, तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. गव्हास स्थानिक व्यापारीवर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात गव्हाची एकूण आवक १८७ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. १३०० ते कमाल रु. १९२२, तर सरासरी रु. १५८० पर्यंत होते. सप्ताहात बाजरीच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. बाजरीस स्थानिक व्यापारीवर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात बाजरीची एकूण आवक ५७ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. ११०० ते कमाल रु. १२७५, तर सरासरी १२०० रुपयांपर्यंत होते. हरभर्याच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. हरभऱ्यास व्यापारीवर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात एकूण आवक १२ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान रु. ३५०० ते कमाल रु. ४८०० तर सरासरी रु. ४५९० पर्यंत होते.