शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

जिल्ह्यातील कंधाणे, उत्राणे येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 1:21 AM

नापिकी, शेतमालाचे कोसळणारे बाजारभाव व कर्जाचा बोजा यामुळे जिल्ह्यातील कंधाणे आणि उत्राणे येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दरम्यान, उत्राणे येथील पस्तीसवर्षीय शेतकºयाने कर्जमाफीसह मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्येतून जीवन संपवत असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

नाशिक : नापिकी, शेतमालाचे कोसळणारे बाजारभाव व कर्जाचा बोजा यामुळे जिल्ह्यातील कंधाणे आणि उत्राणे येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.दरम्यान, उत्राणे येथील पस्तीसवर्षीय शेतकºयाने कर्जमाफीसह मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्येतून जीवन संपवत असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. कंधाणे (ता. बागलाण) येथील शेतकरी बापू सीताराम बिरारी यांनी विष  प्राशन करून जीवनयात्रा संपवली. बिरारी यांच्या नावे सोसायटीचे तीन लाखांचे  कर्ज आहे. गेल्या तीन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमानामुळे अडकवलेले भांडवल व येणारे उत्पादन यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने शेती करणे जिकिरीचे झाले होते. यातच शेतमालाच्या बाजारभावातील अस्थिरता ह्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेपासूनही वंचित राहिल्याने बिरारी सतत कर्जफेडीच्या विंवचनेत राहत होते. रविवारी (दि.१९) त्यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन केले. घरातील सदस्यांचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ सटाणा येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.  उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुली, वडील असा परिवार आहे. मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.सटाणा : शेतीसाठी बँक कर्ज देत नसल्याने नैराश्य आलेल्या बागलाण तालुक्यातील उत्राणे येथील पस्तीस वर्षीय शेतकºयाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि. २१) दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.  प्रवीण कडू पगार असे या शेतकºयाचे नाव आहे. नोकरी मिळत नाही म्हणून शेती विकिसत करण्यासाठी प्रवीणची धडपड सुरू होती. साक्र ी तालुक्यातील म्हसदी येथील बँकेत त्याने शेतीसाठी कर्ज प्रकरण केले. अनेकवेळा त्याने बँकेत हेलपाटे मारले; मात्र ऐनवेळी बँकेच्या अधिकाºयांनी कर्ज देण्यास नकार दिला. यामुळे प्रवीणला नैराश्य आले. त्यातूनच प्रवीण सकाळी अचानक घरातून निघून गेला. घरी जेवणासाठी वाट बघणाºया आई-वडिलांनी दुपारचे तीन वाजले तरी प्रवीण घरी न आल्याने शोधाशोध केली असता एका शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह तरंगतांना आढळून आला.जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवीणचा मृतदेह विहिरीतून काढला. पोलिसांना प्रवीणच्या खिशात चिठ्ठी सापडली असून, त्यात आत्महत्येचे कारण दिलेले आहे. साक्र ी तालुक्यातील म्हसदी येथील बँकेने कर्ज दिले नाही म्हणून आपण जीवनयात्रा संपवत असल्याचे त्याने नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक गुरव यांनी पंचनामा केला. घटनास्थळी तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी भेट दिली. जायखेडा पोलिसांनी घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या