बागलाण तालुक्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 01:25 IST2021-09-16T01:24:32+5:302021-09-16T01:25:20+5:30

चाळीस वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खालचे टेंभे येथे मंगळवारी उघडकीस आली.

Suicide of a young farmer in Baglan taluka | बागलाण तालुक्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

बागलाण तालुक्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सटाणा : चाळीस वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खालचे टेंभे येथे मंगळवारी उघडकीस आली. टेंभे खालचे येथील शेतकरी अभिमन महादू ठोके (वय ४०) हे रात्री शेतीचे काम आटोपून घरी आले. रात्रीचे जेवण घेऊन ते घराच्या पाठीमागील खोलीत झोपले होते. मात्र सकाळी सातच्या सुमारास ते लोखंडी गजाला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या प्रकरणी जायखेडा पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान ठोके यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title: Suicide of a young farmer in Baglan taluka