पंचाळे येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 17:46 IST2019-01-19T17:46:25+5:302019-01-19T17:46:45+5:30

सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथे वीस वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

Suicide by taking a youthful death at Panchaila | पंचाळे येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्त्या

पंचाळे येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्त्या

सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथे वीस वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
पंचाळे येथील संदीप साहेबराव सैंद्रे (२०) या युवकाने बाभळीच्या झाडाला गळफास घेतल्याचे सकाळी दिसून आले. पंचाळे गावापासून एक किलोमीटर अंतरावर भोकणी रस्त्यालगत सैंद्रे यांचे घर आहे. संदीप एस वाय बी ए पर्यंत शिक्षण झाले आहे. त्याने दोन वर्षापूर्वी फायर सेफ्टी चा कोर्स केला होता. सध्या तो एक वर्षापासून मुसळगाव च्या सहकारी औद्योगिक वसाहतीतील रिंग गिअर्स या कारखान्यात काम करीत होता. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता कंपनीची ड्यूटी संपवून संदीप घरी आला. सायंकाळी त्याने गावातील आठवडे बाजारातून भाजीपाला घेतला. रात्री नऊ वाजता जेवण करून झोपी गेला. शनिवारच्या मध्यरात्री केव्हातरी उठून त्याने आत्महत्त्या केल्याचे समजते.
घरापासून सुमारे हजार फूट अंतरावर असलेल्या बाभळीच्या वाळलेल्या झाडाच्या वीस फूट उंचीच्या फांदीला तार व दोरी बांधून गळ्यात अडकून फांदीवरून स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली.

Web Title: Suicide by taking a youthful death at Panchaila