कळमदरे येथील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 18:41 IST2018-11-01T18:41:01+5:302018-11-01T18:41:57+5:30
चांदवड तालुक्यातील कळमदरे येथील विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी आज चांदवड पोलीस स्टेशनमध्ये हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद मयत सौ. शंकुतला केदू गांगुर्डे हिचे वडील त्र्यंबक बाबुराव वक्ते (रा. वडनेरभैरव )यांनी दाखल केली.

कळमदरे येथील विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल
चांदवड : चांदवड तालुक्यातील कळमदरे येथील विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी आज चांदवड पोलीस स्टेशनमध्ये हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद मयत सौ. शंकुतला केदू गांगुर्डे हिचे वडील त्र्यंबक बाबुराव वक्ते (रा. वडनेरभैरव )यांनी दाखल केली. फिर्यादीत म्हटले आहे की, माझी मुलगी सौ.शंकुतला हिचा विवाह एप्रिल२०१२ मध्ये कळमदरे येथील केदू काशीनाथ गांगुर्डे यांचे समवेत झाला. त्यांना सहा वर्षाचा मुलगा व दोन वर्षाची मुलगी आहे. मयत शंकुतला हिचा माहेरुन टॅक्ट्रर व मोटारसायकल घेणेसाठी दोन लाख रुपये आणण्यासाठी छळ केला जात होता. तसेच तिचा भाया खंडू गांगुर्डे हा शंकुतला हिस वाईट नजरेने बघत होता व त्याचा वाईट हेतु साध्य करण्यासाठी तिला त्रास देत असे, असे म्हंटले आहे. शंकुतला हिस वेळोवेळी शारिरिक व मानसिक छळ केला व आत्महत्तेस प्रवृत्त केले अशी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल केला. तर सासरच्या दारापुढेच वक्ते कुंटूबीयांनी मयत शंकुतलाचा अंत्यविधी केला. सहा वर्षाचा मुलगा ओम याने अग्नीडाग दिला.