वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:20 IST2020-07-10T23:54:27+5:302020-07-11T00:20:44+5:30
अंबड परिसरातील दातीरमळा येथील राहत्या घरात छताच्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेत एका वयोवृद्ध व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.९) रात्री घडली. काशीनाथ केदू देशमुख (७४, रा. अंजनी रो-हाउस, दातीरमळा, अंबड) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. देशमुख यांनी गुरुवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.

वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक : अंबड परिसरातील दातीरमळा येथील राहत्या घरात छताच्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेत एका वयोवृद्ध व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.९) रात्री घडली. काशीनाथ केदू देशमुख (७४, रा. अंजनी रो-हाउस, दातीरमळा, अंबड) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. देशमुख यांनी गुरुवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.
उपशिक्षणाधिकाºयास लाच घेताना अटक
नाशिक : जिल्हा परिषदेचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांना सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी रंगेहात अटक केली आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील उप शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी शिक्षक पती-पत्नीकडून सेवा पुस्तिकेवरी स्वाक्षºया करण्यासाठी १५ हजार लाच मागितली होती. या रकमेत तडजोड करून १५ हजार रुपयांऐवजी सहा हजार रुपये घेऊन स्वाक्षºया करण्याचे ठरले होते. या घटनेची माहिती लाचलुुचपत प्रतिबंधक विभागाला मिळताच विभागाचे उपअधीक्षक विजय जाधव यांच्या नेतृत्वातील पथकाने शुक्रवारी सायंकाळी माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात सापळा रचला होता. यावेळी भाऊसाहेब चव्हाण यांना शिक्षक पती-पत्नीकडून सेवा पुस्तिकेवर स्वाक्षºया करून त्याची पूर्तता करण्यासाठी सहा हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली.