तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 00:44 IST2022-02-17T00:43:55+5:302022-02-17T00:44:16+5:30
बागलाण तालुक्यातील भीमखेत येथील अशोक बंडू गांगुर्डे (वय २४) या तरुण शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी छताला अंबाडीच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जायखेडा : बागलाण तालुक्यातील भीमखेत येथील अशोक बंडू गांगुर्डे (वय २४) या तरुण शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी छताला अंबाडीच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
येथील गावकामगार पोलीस पाटील देविदास गांगुर्डे यांनी याबाबत फोनवरून जायखेडा पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहेत.