शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जेलरोडच्या प्रेमीयुगुलाची कसारा घाटात आत्महत्त्या

By admin | Updated: February 28, 2015 23:52 IST

जेलरोडच्या प्रेमीयुगुलाची कसारा घाटात आत्महत्त्या

नाशिक : जुना कसारा घाटानजीक असलेल्या जंगलात प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. आत्महत्त्या करणारे दोघेही जेलरोड, नाशिकरोड येथील रहिवासी असल्याचे कसारा पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या दोघांचीही ओळख पटली असून, मृतदेह नातेवाइकांच्या हवाली करण्यात आले आहेत. जेलरोड राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळील लक्ष्मी केदारनगरी एकदंत अपार्टमेंटमध्ये राहणारा संतोष अनिल गाजरे (वय २१) हा शुक्रवार (दि. २० फेब्रुवारी) रोजी सायंकाळी ५ वाजता बेपत्ता झाला होता. त्याचे वडील अनिल रंगनाथ गाजरे यांनी २७ रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्यात हरविल्याची फिर्याद दाखल केली होती, तर जेलरोड राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळील त्रिमूर्तीनगर येथे राहणारी प्रियंका शंकर काळे (वय १७) ही शुक्रवार (दि. २०) रोजी सायंकाळी घरातून बेपत्ता झाली होती. प्रियंकाचा पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये बारावीचा पहिला पेपर होता. तिच्या घरच्यांनी शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी नातेवाईक, मैत्रिणी व पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये परीक्षेच्या ठिकाणी जाऊन शोधाशोध केली; परंतु प्रियंका कुठेही सापडली नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या दोघांच्या त्यांच्या नातेवाइकांकडून शोध सुरू असतानाच कसारा घाटात त्यांनी आत्महत्त्या केल्याचे उघडकीस आले. मृतदेहांची ओळख पटली असून, मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)