किरकोळ कारणावरून युवकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:35 IST2019-05-04T00:34:17+5:302019-05-04T00:35:23+5:30

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाची कुरापत काढून वास्को चौकात युवकास लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी करण्यात आले.

Suicide caused by youth | किरकोळ कारणावरून युवकास मारहाण

किरकोळ कारणावरून युवकास मारहाण

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाची कुरापत काढून वास्को चौकात युवकास लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी करण्यात आले.
देवळालीगांव लोहार गल्ली येथील फिरोज रमजान मणियार याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित मुख्तार चिरागोद्दीन मणियार रा. लोहार गल्ली देवळालीगांव यांच्यात गेल्या काही महिन्यापासून वाद चालू आहे. संशयित मुख्तार मणियार हा अधुनमधून कुरापत काढून फिरोज मणियार यास शिवीगाळ व मारहाण करत असतो.
गुरूवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वास्को चौकात संशयित मुख्तार याने फिरोज यास शिवीगाळ करून लाकडी दांड्याने पायावर मारून पाय फ्रॅक्चर केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Suicide caused by youth