शौचालयात लुघुशंका करण्याचा सल्ला देणाऱ्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 16:35 IST2018-08-31T16:34:15+5:302018-08-31T16:35:05+5:30
नाशिक : उघड्यावर लघुशंका करण्यापेक्षा शौचालयात जा असे सांगणाºया तरुणास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना टिळकवाडीतील दगडी चाळ परिसरात घडली. या प्रकरणी संशयित नाज्या (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शौचालयात लुघुशंका करण्याचा सल्ला देणाऱ्यास मारहाण
नाशिक : उघड्यावर लघुशंका करण्यापेक्षा शौचालयात जा असे सांगणाºया तरुणास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना टिळकवाडीतील दगडी चाळ परिसरात घडली. या प्रकरणी संशयित नाज्या (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिळकवाडीतील महात्मा फुले वसाहतीतील रहिवासी पंकज वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी (दि. २९) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दगडी चाळीजवळील सार्वजनिक शौचालयाजवळ संशयित नाज्या हा शौचालयाच्या बाहेर उघड्यावर लघुशंका करीत होता़ त्यास वाघमारे यांनी या परिसरातून महिला ये-जा करीत असतात, तू शौचालयात जाऊन लघुशंका कर असे सांगितले़
या सल्ल्याचा राग आलेल्या संशयित नाज्याने वाघमारे यांना जबर मारहाण केली़