सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 15:58 IST2025-06-15T15:26:27+5:302025-06-15T15:58:39+5:30
शिवसेना ठाकरे गटाने सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केली आहे. दरम्यान, आता ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
राज्यात काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षात हालचालींना वेग आला आहे. नाशिकमधील ठाकरे गटाचे सुधाकर बुडगुजर भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. काही दिवसापूर्वी बुडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, यानंतर ठाकरे गटातून त्यांची हकालपट्टी केली. तर दुसरीकडे भाजपामध्ये प्रवेशाला अंतर्गत विरोध सुरू होता. दरम्यान, आता बुडगुजर यांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त ठरल्याचे समोर आले.
सुधाकर बडगुजरांची कोंडी! CM फडणवीसांसमोर भाजप आमदार, माजी नगरसेवकांनी मांडली गुन्ह्यांची कुंडली
आता स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला असून सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त लागणार आहे. स्थानिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप होत असतात. पण, पक्ष वाढीसाठी प्रदेश पातळीवर निर्णय होतो. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे स्पष्टीकरण भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिले.
सुनिल केदार म्हणाले, आपण जरी त्यांना पक्षात घेतले नाही तरी ते इतर पक्षात जाणारच आहेत. त्यामुळे त्यांना आपण प्रवेश दिला पाहिजे, असे त्यांनी आम्हाला सूचित केलेले आहे. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. स्थानिकांचा विरोध साहजिकच आहे. निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले आहेत. एकमेकांविरुद्ध आरोप केलेले आहेत. त्यामुळे स्थानिक नाराज असतात. पण, वरिष्ठांनी आम्हाला शब्द दिला आहे की, स्थानिकांच्या कुठल्याही हक्कावर अडसर येणार नाही.
आधी केला विरोध
बुडगुजर यांच्या प्रवेशाला भाजपामधूव आधी नेत्यांनी विरोध केला. विविध घोटाळे व वेगवेगळ्या प्रकारच्या २९ गुन्ह्यांची कुंडली सादर करीत सुधाकर बडगुजर यांना भाजपात घेऊ नये, या मागणीसाठी आमदार सीमा हिरे यांच्यासह १४ माजी नगरसेवक आणि डझनभर पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यांना पक्षात घेण्यास तीव्र विरोध केला. असा प्रकार असेल तर प्रवेशासंदर्भात नक्कीच विचार करू, असे आश्वासन बावनकुळे यांनी शिष्टमंडळास दिले होते.