सुदामदास महाराज महंतपदी विराजमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:40 IST2020-12-25T20:05:15+5:302020-12-26T00:40:12+5:30
जोरण : अखिल भारतीय श्री. पंच दिगंबर अनी आखाड्याचे उपाध्यक्ष रामकिशोरदासजी शास्त्री यांचे शिष्य संत सुदामा दास महाराज यांना शेकडो साधुसंत यांच्या उपस्थितीत श्री. श्री. १०८ श्री. महंतपदी गादीवर विराजमान करण्यात आले. यावेळी सोहळ्याला उपस्थित असलेले विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी क्षेत्र विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही दिली.

सुदामदास महाराज महंतपदी विराजमान
बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक मुल्हेर किल्ला येथील जागृत तीर्थक्षेत्र शिव मंदिर असून येथे संत सुदामदास महाराज यांचे वास्तव्य आहे. यावेळी संत सुदामादास महाराज यांना गादीवर विराजमान करण्यात आले. तत्पूर्वी किल्ल्यावर विविध विकास कामांचे भूमिपूजन नरहरी झिरवाळ, साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, साधना गवळी, वसंत गवळी, कृष्णा भामरे, संजय भामरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. साक्री येथील जिल्हा परिषद सदस्य गोकूळ परदेशी, रोहिदास जाधव, पवन तिवारी, भास्कर अहिरे यांच्या हस्ते सपत्नीक किल्ल्यावर सुंदरकांड हवन, लघुरुद्र, शिवमहिमा स्तोत्र पाठ, धार्मिक पूजन करण्यात आले. हभप विश्वनाथ महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. सहकार अधिकारी वसंत गवळी, अरुणकुमार भामरे यांनी प्रास्ताविक केले तर योगेश शास्त्री यांनी मंत्रपठन करून धार्मिक पूजन केले. यावेळी मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, बाजार समिती सभापती संजय भामरे, संचालक कृष्णा भामरे, आबा बच्छाव यांनी मनोगत व्यक्त केले व महंत संत सुदामादास महाराज यांचे तिलक पूजन केले. कार्यक्रमाला द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत, उपसभापती राघो अहिरे, संचालक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विश्राम निकम, अशोक पवार, नाशिक येथील नगरसेवक दिनकर पाटील, जि. प. सदस्य यतीन पगार, के.पी. जाधव, साधना गवळी, रेखा पवार, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अरुणकुमार भामरे यांनी केले तर सहकारी अधिकारी वसंतराव गवळी यांनी आभार मानले.