पोलीस कर्मचाऱ्याची अशीही माणुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 23:09 IST2020-03-27T23:09:04+5:302020-03-27T23:09:22+5:30

पिंपळगाव जलाल येथील टोल नाक्यावर रस्त्याने पायी चालत असलेल्या एका भिकाºयाला पोलीस कर्मचारी संतोष बागुल यांनी आपल्याजवळील पाणी बॉटल आणि मास्क देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

Such a humanity of a policeman | पोलीस कर्मचाऱ्याची अशीही माणुसकी

पोलीस कर्मचाऱ्याची अशीही माणुसकी

येवला : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील टोल नाक्यावर रस्त्याने पायी चालत असलेल्या एका भिकाºयाला पोलीस कर्मचारी संतोष बागुल यांनी आपल्याजवळील पाणी बॉटल आणि मास्क देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू आहे. पिंपळगाव जलाल येथील टोल नाक्यावर पोलिसांकडून येवला शहराकडे येणाºया वाहनांची तपासणी केली जात आहे. या दरम्यान, पोलीस कर्मचारी बागुल कर्तव्य बजावत असताना त्यांना रस्त्याने पायी चालत असलेला भिकारी दिसून आला. बागुल यांनी त्या भिकाºयाजवळ जाऊन, त्याला आपल्याजवळील पाणी बॉटल व मास्क दिले आणि त्याच्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले.

Web Title: Such a humanity of a policeman