नाशकात २५ दिवसांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 14:22 IST2018-09-22T14:21:16+5:302018-09-22T14:22:02+5:30
बाळावर शहरात यशस्वीपणे ‘बलून कोअर आॅक्टोप्लास्टी’ या आधुनिक पद्धतीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली

नाशकात २५ दिवसांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया
नाशिक- जन्मल्याबरोबरच ह्रद्याच्या रक्तवाहिनीत दोष असल्याने दुग्धपान करण्यास आणि श्वासोच्छवासास घेऊ न शकणाऱ्या २५ दिवसाच्या आणि ३१०० ग्रॅम वजनाच्या बाळावर शहरात यशस्वीपणे ‘बलून कोअर आॅक्टोप्लास्टी’ या आधुनिक पद्धतीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे बाळ आता व्यवस्थीत श्वास घेऊ शकत असून त्याची प्रकृती उत्तम आहे.
बालरोगतज्ञांनी बाळाच्या ह्रदयाची सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. बाळाला जन्मत: ह्रदयाच्या रक्तवाहिनीत दोष असल्याचे निदान समोर आले. यानंतर डॉ. ललित लवणकर यांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेऊन बाळाच्या शरीरास इजा न पोहोचविता बलून तंत्राचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला. कुठल्याही प्रकारचे टाके न घालता ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी भुलरोगतज्ञ डॉ. स्वाती चंद्रात्रे यांचीही साथ लाभली.