प्लॅस्टिक अस्तरीकरणामुळे गळती थांबविण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 00:32 IST2020-10-30T21:30:11+5:302020-10-31T00:32:30+5:30
सिन्नर : तालुक्यातील मोहदरी येथील ५० वर्षांपूर्वीच्या बंधाऱ्याची गळती थांबवण्यात प्लॅस्टिक अस्तरीकरणामुळे यश आले आहे.

प्लॅस्टिक अस्तरीकरणामुळे गळती थांबविण्यात यश
सिन्नर : तालुक्यातील मोहदरी येथील ५० वर्षांपूर्वीच्या बंधाऱ्याची गळती थांबवण्यात प्लॅस्टिक अस्तरीकरणामुळे यश आले आहे. त्यामुळे पाणीसाठा टिकून राहण्याबरोबरच परिसरातील भूजल पातळीवाढीस मोठी मदत झाली आहे. प्लॅस्टिक अस्तरीकरणाच्या या पथदर्शी उपक्रमाने मोहदरी, मोह या गावांतील शेती सिंचनालाही फायदा होणार आहे. या वाढलेल्या पाणीसाठ्याचे जलपूजन करण्यात आले. खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता संजय सानप, पंचायत समितीचे उपसभापती संग्राम कातकाडे, सदस्य भगवान पथवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, संजय सानप, गणेश आव्हाड, सुभाष लांडगे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शीतल सांगळे, सदस्य सुनीता संजय सानप यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. गळती थांबल्याने बंधाऱ्यात १५ दलघफू पाणीसाठा होणार आहे. परिसरातील ५०हून अधिक विहिरींची भूजल पातळी वाढण्यास मदत होऊ शकेल, तर १५०हून अधिक एकर शेती सिंचनाला फायदा होईल. पाणी टिकून राहणार असल्याने टंचाई स्थितीवरही मोठ्या प्रमाणात मात करता येणार आहे. यावेळी अरुण बिन्नर, अशोक बिन्नर, कैलास बिन्नर, मदन बिन्नर, लक्ष्मण बिन्नर, शांताराम बिन्नर, दिलीप बिन्नर, निवृत्ती होलगीर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
----
एक कोटी ९३ लाखांची विकासकामे
माजी आमदार राजाभाऊ वाजे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, सुनीता सानप यांच्या निधीतून मुख्यमंत्री पेयजल योजनेतून वाड्यावस्त्यांसह गावाला पाणीपुरवठा, स्मशानभूमी शेड, रस्ते कॉंक्रिटीकरण, सभामंडप, व्यायामशाळा, शाळा दुरुस्ती, पेव्हर ब्लॉक आदी एक कोटी ९३ लाख रुपयांच्या कामांचे लोकार्पण करण्यात आले.