पुरणगाव शाळेचे राज्यस्तरीय जंप रोप स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 18:24 IST2018-12-13T18:24:05+5:302018-12-13T18:24:36+5:30

पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरु कुल व जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोलापूर झालेल्या सब.ज्युनिअर राज्यस्तरीय जंप रोप अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होऊन गुरुकुलातील अनेक पदके मिळविले.

The success of the state-level jump race champion of Puranaga School | पुरणगाव शाळेचे राज्यस्तरीय जंप रोप स्पर्धेत यश

पुरणगाव येथील आत्मा मालिक गुरु कुलातील जंप रोप स्पर्धेतील विजेत्या स्पर्धेकांसमवेत गुरु कुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे, प्रकाश भामरे, अमोल आहेर, प्रवीण घोगरे.

जळगाव नेऊर : पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरु कुल व जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोलापूर झालेल्या सब.ज्युनिअर राज्यस्तरीय जंप रोप अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होऊन गुरुकुलातील अनेक पदके मिळविले. महाराष्ट्र राज्य जंप रोप असोसिएशन व सोलापूर जिल्हा जंप रोप असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर येथे राज्यस्तरीय जंप रोप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गुरु कुलातील विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत ३० सेकंद डबल अंडर या प्रकारात नंदिनी राऊत, (सुवर्णपदक), अंजना लहारे (रौप्य), रोहित पदवी (रौप्य).
३० सेकंद स्पीड प्रकारात धीरज चव्हाण (सुवर्ण)
फ्री स्टाइल प्रकारात दीपक कुंभार (रौप्य), दीपाली चौधरी (कांस्य), इंडुरन्स या प्रकारात सुरेखा घुले (कांस्य).
डबल अंडर सांघिक प्रकारात (सुवर्ण)
रोहित पडवी, दिशा महाले, नंदिनी राऊत, दीपाली चौधरी, करिना चौधरी, सेकंद स्पीड सांघिक प्रकारात (रौप्य), प्रतीक भोये, धीरज चव्हाण, दीपक कुंभार, योगिराज शिरसाथोडा यांनी मिळविले.

Web Title: The success of the state-level jump race champion of Puranaga School