पांगरी शाळेचे चित्रकला परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:14 IST2020-01-29T22:31:50+5:302020-01-30T00:14:41+5:30

पांगरी येथील रयत शिक्षण संस्था संचलित श्री संत हरिबाबा विद्यालयाने शासकीय रेखाकला, चित्रकला परीक्षेचा शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे

Success in Pangari School of Painting Exam | पांगरी शाळेचे चित्रकला परीक्षेत यश

सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे शासकीय चित्रकला परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह शिक्षक.

 पांगरी : येथील रयत शिक्षण संस्था संचलित श्री संत हरिबाबा विद्यालयाने शासकीय रेखाकला, चित्रकला परीक्षेचा शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. परीक्षेत इयत्ता सातवी ते दहावीतील एकूण ९५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
यामध्ये ‘अ’ श्रेणीमध्ये ९, ‘ब’ श्रेणीमध्ये २८, ‘क’ श्रेणीमध्ये ५८, विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये श्रुती कैलास गवळी, ऋतुजा संतोष कुटे, निकिता शांताराम निरगुडे, समृद्धी राजेंद्र पगार, श्रुती भीमाशंकर पगार, स्नेहा ज्ञानेश्वर पगार, हर्षदा बाबासाहेब पांगारकर, पल्लवी दादासाहेब पांगारकर, धनश्री लहानू शिंदे हे ‘अ’ श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहे. इयत्ता १० वीच्या बोर्ड परीक्षेत ‘अ’ श्रेणीसाठी ७ गुण, ‘ब’श्रेणीसाठी ५ गुण, व ‘क’ श्रेणीसाठी ३ गुण असे गुणदान या विद्यार्थ्यांना होणार आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक जी. डी. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष अ‍ॅड. विलास पगार, मुख्याध्यापक डी. बी. गोसावी तसेच सर्व स्कूल कमिटी सदस्य यांच्या हस्ते सर्व उत्तीर्ण विधार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Success in Pangari School of Painting Exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.