मालेगावी वंदेमातरमच्या आंदोलनाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 00:39 IST2021-06-20T23:48:36+5:302021-06-21T00:39:32+5:30

मालेगाव : कॅम्पातील यश रावळगाव नाका ते साई बाजारपर्यंतच्या रस्त्याच्या मध्यभागी असलेले महावितरणचे धोकादायक खांब तात्काळ काढावेत यासाठी वंदेमातरम संघटनेने केलेल्या आंदोलनाला यश मिळाले असून, प्रशासनाने खांब हटवून रस्ता मोकळा केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Success to Malegaon Vandemataram movement | मालेगावी वंदेमातरमच्या आंदोलनाला यश

मालेगावी वंदेमातरमच्या आंदोलनाला यश

ठळक मुद्दे अधिकाऱ्यांनी खांब हटविण्याचे आश्वासन दिले होते.

मालेगाव : कॅम्पातील यश रावळगाव नाका ते साई बाजारपर्यंतच्या रस्त्याच्या मध्यभागी असलेले महावितरणचे धोकादायक खांब तात्काळ काढावेत यासाठी वंदेमातरम संघटनेने केलेल्या आंदोलनाला यश मिळाले असून, प्रशासनाने खांब हटवून रस्ता मोकळा केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

वंदेमातरम संघटनेने केलेल्या धरणे आंदोलनाच्या वेळी मनपाच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी खांब हटविण्याचे आश्वासन दिले होते. वीज वितरण कंपनीचे रवी देवरे व ठेकेदार प्रशांत चव्हाण यांनी तीन आठवडे मुदत मागून घेतली होती. वीस दिवसांत काम पूर्ण करून सोमवार बाजार रावळगाव नाका ते साई बाजार हा रस्ता मोकळा केल्याने रहदारी मोकळी झाली. आंदोलनात जगदीश गोऱ्हे, शीतल चोरडिया, यज्ञेश अहिरराव, रवी कुलकर्णी, संजय घुले, सागर परदेशी सहभागी झाले होते.

Web Title: Success to Malegaon Vandemataram movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.