विभागीय वेटलिफ्टींग स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 14:57 IST2018-10-27T14:57:19+5:302018-10-27T14:57:35+5:30

कसबे-सुकेणे: - मनमाड येथे झालेल्या विभागीय क्र ीडा स्पर्धेत मौजे सुकेणे येथील कर्मवीर रावसाहेब थोरात कनिष्ठ महाविद्यालयाचा रोहन शरद जाधव याने वेटलिफ्टींग स्पर्धेत १०२ वजनी गटांत प्रथम क्र मांक पटकावला.

Success in the departmental weight lifting competition | विभागीय वेटलिफ्टींग स्पर्धेत यश

विभागीय वेटलिफ्टींग स्पर्धेत यश

कसबे-सुकेणे: - मनमाड येथे झालेल्या विभागीय क्र ीडा स्पर्धेत मौजे सुकेणे येथील कर्मवीर रावसाहेब थोरात कनिष्ठ महाविद्यालयाचा रोहन शरद जाधव याने वेटलिफ्टींग स्पर्धेत १०२ वजनी गटांत प्रथम क्र मांक पटकावला. नाशिक जिल्हा क्र ीडा कार्यालय आयोजित विभागीय वेटलिफ्टींग स्पर्धा मनमाड येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत मौजे सुकेणे येथील केआरटी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा खेळाडू रोहन शरद जाधव याने १०२ वजनी गटात प्रथम क्र मांक पटकाविला व राज्यस्तरिय स्पर्धेकरिता पात्र ठरला. मविप्र अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सरचिटणीस निलिमा पवार, सभापती माणिकराव बोरस्ते, निफाड तालुका संचालक प्रल्हाद गडाख यांच्या हस्ते रोहनचा सत्कार करण्यात आला. खेळाडूस प्राचार्य ए एम. पवार, ज्युनियर कॉलेज प्रमुख राजेंद्र धनवटे, क्र ीडा शिक्षक दिलीप काळे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Success in the departmental weight lifting competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक