नाशिक : परिसरासह नाशिक शहरातील विविध भागात दिवसेंदिवस सोनसाखळी चोरांचा धुमाकुळ वाढत असताना सोनसाखळी चोरट्यांंनी शहर पोलिसांसमोर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेविषयी आव्हान निर्माण केलेल असताना इंदिरानगर भागात सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे सोनसाखळी चोरणाºया दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना दिवसागणिक वाढत होत्या. त्यामुळे पोलिसांपुढे या सोनसाखळी चोरट्यांना अटक करण्याचे आव्हान निर्माण झालेले असताना गुरुवारी (दि.८) पाच वाजेच्या सुमारास शोभा गोवर्धने (३२) या मुलाला क्लासला सोडून नहरीनगर येथून घराकडे पायी जात असताना शिवमंदिरासमोरून काळया रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या तीन इसमांपैकी मागे बसलेल्या भामट्याने त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम सोन्याची यांचे सुमारे ५० हजार रुपये किमतीची मंगळसूत्र खेचून नेल्याची घटना घडली होती. या या घटनेनंतर इंदिरानगर पोलस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने सीसीटीवी फुटेज तपासले असता मोटारसायकलवरून जाताना तीन्ही चोरटे पोलिसाना आढळून आले. त्याच्या पुटेजच्या आधारे आणि गोपनीय माहिती नुसार पोलिसांनी संशयित आरोपी सुनील ताटे (२९) राहणार आंबेडकर वाडी चुंचाळे, प्रतीक दोंदे (२०) राहणार आंबेडकर वाडी चुंचाळे या दोघांना अटक केली आहे. पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलिस उपायुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण ,उपनिरीक्षक अंकुश दांडगे ,गुन्हे शोध पथकाचे दत्तात्रेय पाळदे, दत्तात्रय गवारे, राजेश निकम, रियाज शेख, अखलाक शेख, राजू राऊत, भगवान शिंदे, शरदआहेर यांच्यासह कर्मचाºयांनी सापळा रचून शिताफीने या सोनसाखळी चोरट्यांना अटक केली. दरम्यान, दोन्ही सोनसाखळी चोरट्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची तीन दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
सोनसाखळ्या चोरट्यांंच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 17:51 IST
परिसरासह नाशिक शहरातील विविध भागात दिवसेंदिवस सोनसाखळी चोरांचा धुमाकुळ वाढत असताना सोनसाखळी चोरट्यांंनी शहर पोलिसांसमोर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेविषयी आव्हान निर्माण केलेल असताना इंदिरानगर भागात सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे सोनसाखळी चोरणाºया दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
सोनसाखळ्या चोरट्यांंच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश
ठळक मुद्देइंदिरानगर परिसरातील दोन सोनसाखळी चोरांना अटक पोलिसांची गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई