लाखोंचा गुटखा पकडण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:10 IST2019-07-19T23:07:02+5:302019-07-20T00:10:09+5:30
गुजरातमधून नाशिकच्या सिडको परिसरात गुटख्याची तस्करी करणाऱ्या एका वाहनचालकासह चारचाकी वाहन आणि लाखो रुपयांचा गुटखा पकडण्यात पोलिसांना यश आहे आहे. पोलिसांनी शुक्रवारी (दि.१९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील रासबिहारी चौकात कारवाई करून हा मुद्देमाल हस्तगत केला.

लाखोंचा गुटखा पकडण्यात यश
पंचवटी : गुजरातमधून नाशिकच्या सिडको परिसरात गुटख्याची तस्करी करणाऱ्या एका वाहनचालकासह चारचाकी वाहन आणि लाखो रुपयांचा गुटखा पकडण्यात पोलिसांना यश आहे आहे. पोलिसांनी शुक्रवारी (दि.१९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील रासबिहारी चौकात कारवाई करून हा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुजरातमधून गुटखा घेऊन आडगावकडून नाशिकच्या दिशेने येत असलेल्या महिंद्रा मार्शल (एमएच १५ आर ३७७५) वाहनाचा चालक वाहतूक शाखेच्या पोलिसांना चकवा देत पळ काढण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, पोलिसांनी संशयित वाहन अडवून त्याची तपासणी केली असता त्यातून तीन ते चार लाख रुपये किमतीचा गुटखा पोलिसांना आढळून आला. या कारवाईत पेठ येथील वाहनचालक शंकर येवला (३१) याला ताब्यात घेत चारचाकी वाहनासह गुटखा जप्त केला असून, संशयिताला आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. येवला पोलिसांना चकवा देत रासबिहारी चौकातून सिडकोकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे जप्त केलेला गुटखा गुजरातमधून आणून त्याची सिडकोत तस्करी होत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. वाहतूक शाखेचे झेब्रा पथक पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी गणेश माळवाल, राजेंद्र जाधव, अनंत गारे, अमोल काळे या कर्मचाऱ्यांनी असे मुंबई-आग्रा महामार्गावरील रासबिहारी चौक परिसरात गस्त घालत असतानाही कारवाई केली.
दरम्यान, आडगाव ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी सदर घटनेबाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती देत पंचनामा केला. त्यानुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
अन्न औषध प्रशासनाविषयी साशंकता
नाशिक शहरात दररोज लाखो रुपये किमतीचा गुटखा चोरी छुप्या पद्धतीने आणला जात असला तरी शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला याची कोणत्याही प्रकारचा सुगावा लागत नाही. शिवाय संबंधित अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नसल्याने नाशिक शहरात बहुतांश दुकानांमध्ये गुटख्याची विक्री होताना दिसून येते. महिनाभरापूर्वीच आडगाव शिवारातील बलीमंदिर चौकातअशाच प्रकार गुटखा पकडण्यात आला होता. मात्र याबाबत अन्न व औषध प्रशासन अनभिज्ञ असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या भूमिकेविषयी साशंका व्यक्त होत आहे.