शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

अडीच लाखांचा गुटखा पकडण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:18 AM

मुंबई-आग्रा महामार्गावरील बळी मंदिर रस्त्यावर शुक्रवारी (दि.२१) दुपारी नाकाबंदीदरम्यान वाहन तपासणी करीत असताना वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना चकवा देत चारचाकीसह पळ काढणाºया संशयितांचे वाहन अडवून सुमारे दोन लाख रुपये व ३२ हजार रुपये किमतीचा ६२ गोण्या गुटख्यासह दोन संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

पंचवटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील बळी मंदिर रस्त्यावर शुक्रवारी (दि.२१) दुपारी नाकाबंदीदरम्यान वाहन तपासणी करीत असताना वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना चकवा देत चारचाकीसह पळ काढणाºया संशयितांचे वाहन अडवून सुमारे दोन लाख रुपये व ३२ हजार रुपये किमतीचा ६२ गोण्या गुटख्यासह दोन संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.नाशिकच्या दोघा संशयितांसह चारचाकी वाहन आणि ६२ गोण्यातील दोन लाख ३२ हजार रुपयांचा गुटखा असा सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हेगारीवर वचक बसावा यासाठी पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण नाशिक शहरात दिवस-रात्र नाकाबंदी केली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत मुंबई-आग्रा महामार्गावरील बळी मंदिर चौफुलीवर शुक्रवारी नाकाबंदी सुरू असताना पांढºया रंगाच्या एरटीगा चारचाकी क्रमांक (एमएच ३९जे ३७४३) पोलिसांना चकवा देत रासबिहारी रस्त्याने पळून जाऊ लागल्याने पोलिसांना संशय आल्याने संबंधित वाहन थांबवून पोलिसांनी वाहनाची तपासणी केली.यावेळी वाहनातून ६२ गोण्यांमध्ये गुटख्याची वाहतूक होत असल्याचे समोर आले. याबाबत आडगाव पोलिसांना माहिती देत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार यांनी संशयितांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी पाथर्डीफाटा येथील जैद शेख व भद्रकाली येथे राहणाºया फैयाज शेख अशा दोघांना ताब्यात घेतले आहे.पोलीस निरीक्षक इनामदार, पोलीस शिपाई गणेश माळवाल, संदीप मालसाने यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी घटनेविषयी अन्न व औषध प्रशासनालाही माहिती देत पंचनामा केला.शहरात सर्रासपणे गुटख्याची तस्करीगुटखा सेवनाने आरोग्यावर होणारे घातक परिणाम लक्षात घेऊन तसेच युवा पिढीत गुटख्याची व्यसनाधीनता टाळण्यासाठी शासनाने गुटख्यावर बंदी घातली आहे. तरीही शहरात वेगवेगळ््या मार्गाने सºहासपणे गुजरात राज्यातून गुटखा आणल्याचे दिसून येत आहे. नाशिक शहरातील विशेषता भद्रकाली व जुने नाशिक भागात असलेले तंबाखू विक्रीवाले सर्रासपणे गुटखा खरेदी करून नाशिक शहरातील पान टपरी चालक ते किराणा दुकानदारापर्यंत पोहोचत असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आले आहे.अन्न औषध प्रशासन अंधारात?नाशिक शहरात दैनंदिन लाखो रुपयांचा गुटखा चोरीछुपे या पद्धतीने आणला जात असला तरी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे गुटख्याच्या वाहतुकीबाबत तसेच नाशिक शहरात दुकानांमध्ये गुटका असल्याबाबत अन्न व औषध प्रशासन अंधारात आहे की काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. अवैधरीत्या होणाºया गुटख्याच्या वाहतूक व विक्रीवर अन्न औषध प्रशासन विभागाकडून कारवाई अपेक्षित असली तरी त्यांच्याकडून ठोस कारवाई होत नसल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाई बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :NashikनाशिकFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग