शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

शहरात कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 01:46 IST

शहरात कोरोनाबाधितांची संख्या रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मिशन झिरो नाशिक मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात चाचण्या घेण्यात येत आहे. त्यामुळे तत्काळ रुग्ण आढळून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याने संसर्ग रोखण्यात यश येत आहे.

ठळक मुद्देमिशन झिरो नाशिक : दिवसभरात साडेचारशे रुग्ण; पाच जणांचा मृत्यू

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मिशन झिरो नाशिक मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात चाचण्या घेण्यात येत आहे. त्यामुळे तत्काळ रुग्ण आढळून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्यानेसंसर्ग रोखण्यात यश येत आहे.एकूण चाचण्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण १२.४३ टक्के आहे.दरम्यान, मंगळवारी (दि. १८) ४५२ रुग्ण आढळले आहेत, तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मुंबई, पुणे, ठाण्यापाठोपाठ अ‍ॅँटिजेन चाचण्यांमध्ये नाशिकचा चौथ्या क्रमांक आहे. चाचण्यांमधून तब्बल ४ हजार ३३४ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मंगळवारी (दि. १८) दिवसभरात एक हजार १५१ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या त्यात १८८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सर्व शासकीय रुग्णालये व खासगी लॅब मिळून ४५२ रुग्ण आढळले आहेत, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात सीआयसीएस कॉलनी, नेहरूनगर येथील ५६ वर्षीय पुरुष रुग्ण, स्रेहनगर येथील ७२ वर्षीय वृद्ध, सिडकोतील पवननगर येथील ४७ वर्षीय पुरुष, नाशिकरोड येथील जेलरोड भागातील ५१ वर्षीय महिला तसेच नाशिक शहरातील ५३ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. शहरात कोरोना-बाधितांची संख्या वाढत असल्याने नाशिक महापालिका आणि भारतीय जैन संघटनेने मिशन झिरो सुरू केले आहे.त्याअंतर्गत मिशन झिरो नाशिककरिता २२५च्यावर कर्मचारी व कार्यकर्त्यांचे पथक असून, मोहिमेच्या २५व्या दिवशी एक हजार १५१ नागरिकांनी आपल्या अँटिजेन चाचण्या करून घेतल्या व त्यापैकी १८८ रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत २५ दिवसात ३४,८६१ अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या असून, ४३३४ पॉझिटिव्ह रुग्ण हुडकून काढण्यात यश आले आहे. त्याचप्रमाण एकूण झालेल्या चाचण्यांपैकी १२.४३ टक्के असल्याची माहिती मोहिमेचे प्रमुख नंदकिशोर साखला यांनी दिली.चाचणीबरोबरच प्रबोधनही सुरूया मोहिमेअंतर्गत केवळ रुग्णांचा शोधच घेतला जात नसून त्यांच्यावर उपचार व प्रबोधनदेखील करण्यात येत आहे. यावेळी पॉझिटिव्ह रुग्णांना औषधोपचार देतानाच आयुर्वेदिक काढा देणे, समुपदेशन करणे, रुग्णांचा पाठपुरावा करणे व कुटुंबातील व संपर्कातील इतर व्यक्तींची तपासणी करणे अशा प्रकारची कामे केली जात आहेत.साडेचौदा हजाररुग्ण कोरोनामुक्त४नाशिक शहरात एप्रिल महिन्यापासून आत्तापर्यंत १७ हजार ४२० रुग्ण आढळले आहेत. त्यातील १४ हजार ६६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत २ हजार ३४९ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी बरे होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.४मोबाइल व्हॅनद्वारे लोकवस्तीच्या भागात नागरिकांची आरोग्य तपासणी करून चाचण्या करण्यात येत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य