शाळेतल्या विद्यार्थ्यांनी विझवला वणवा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 18:57 IST2021-02-09T18:56:12+5:302021-02-09T18:57:03+5:30
इगतपुरी : तालुक्यातील जुनवणेवाडी येथील वीजेच्या ट्रान्फार्मरची ठिणगी पडल्यामुळे तिथल्या गवताने पेट घेतला. बाजुला वाळलेले गवत असल्याने आग लवकरच भडकली. बघता बघता आग बाजुच्या भाताच्या पेंढ्यांना कवेत घेवुन वाडीतील घरांकडे येईल अशी परिस्थिती होती. शाळेतला विद्यार्थ्यांना धुर व आग दिसताच त्यांनी वरिष्टांना कळवित आग विझविण्याकरीता घटनास्थळी घाव घेतली व काही वेळातच आग आटोक्यात आणली.

शाळेच्या जवळच काही अंतरावर वणवा पेटल्याचे दिसताच विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक गणपत घारे व शिक्षक वैभव गर्गे यांना अवगत केले. दुपारच्या वेळी वाडीवरील मोठी माणसे बाहेर कामाला गेलेली होती. अशा परिस्थितीत समयसुचकता दाखवत दोन्ही शिक्षकांनी मोठ्या विद्यार्थ्यांना हाताशी घेत योग्य नियोजन करून वनई व फांगळीच्या रोपांच्या झुबकेदार फांद्यांचा वापर करत आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच भाताच्या पेंढ्यांचे उडवे व वाडीतील घरांना वाचवले व खऱ्या अर्थाने आपत्ती व्यवस्थापन कसे करायचे याचा वस्तुपाठच या निमीत्ताने घालुन दिला. त्यामुळे मोठ्या प्रकारची हानी होण्यापासुन बचाव झाला. याबद्दल
विद्यार्थी व शिक्षकांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
चौकट...
दुपारच्या वेळी गावातील मोठी मंडळी कामाला बाहेर गेलेले असताना, त्याचवेळी लागलेल्या या आगीच्या संकटातुन मार्ग काढणारे शाळेचे विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतूक करो तेवढे कमीच आहे. विद्यार्थ्यी व शिक्षकांच्या समय सुचकतेमुळे वणवा आटोक्यात येवून पुढील विघकन टळले.
- दत्ता खडके, ग्रामस्थ, जुनवणेवाडी.