ब्राह्मणगाव येथे वाहनाच्या धडकेत विद्यार्थी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:12 IST2018-04-14T00:12:33+5:302018-04-14T00:12:33+5:30

सटाणा - मालेगाव रस्त्यावर शुक्रवारी सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकने सातवीत शिकणारा यशार्थ वर्धमान शिंदे (१३) ठार झाला.

 Students killed in the vehicle at Brahmangaon | ब्राह्मणगाव येथे वाहनाच्या धडकेत विद्यार्थी ठार

ब्राह्मणगाव येथे वाहनाच्या धडकेत विद्यार्थी ठार

ब्राह्मणगाव : सटाणा - मालेगाव रस्त्यावर शुक्रवारी सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकने सातवीत शिकणारा यशार्थ वर्धमान शिंदे (१३) ठार झाला. यशार्थ रस्त्याने नेहमीप्रमाणे फिरायला गेला असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयात नेले असता डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मालेगावी रवाना करण्यात आले. मात्र उपचाराआधीच त्याचे निधन झाले.  यशार्थ सातवीच्या वर्गात शिकत होता. सर्वसामान्य कुटुंबातील यशार्थ शाळेतही हुशार होता. त्याला तीन बहिणी आहेत. भजन, कीर्तनची गोडी होती. दुर्दैवाने त्याच्यावर काळाने घाला घातला व कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्याच्या दुर्दैवी मृत्यूने गावावर पूर्ण शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. सटाणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Students killed in the vehicle at Brahmangaon

टॅग्स :Accidentअपघात