शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

विद्यार्थी वाहतूकदार आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:15 AM

रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा उपद्रव नाशिक : जुने नाशिक परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. कुत्र्यांच्या झुंडी सकाळी आणि रात्रीच्या ...

रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा उपद्रव

नाशिक : जुने नाशिक परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. कुत्र्यांच्या झुंडी सकाळी आणि रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून फिरत असल्याने नागरीकांनाही त्यांची भीती वाटत आहे. विशेषता: सकाळच्या सुमारास या कुत्र्यांचा मॉर्निग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. अनेकांना तर मार्ग देखील बदलावा लागतो.

धूम्रपान करणाऱ्यांवर कारावाई करावी

नाशिक : कोविडच्या काळात रस्त्यावर थुंकणाऱ्यामुळे संसर्ग पसरण्याची भीती असूनही नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली असून, कोणीही नियमांचे पालन करण्याच्या मानसिकतेत नाही. या प्रकाराला आळा घालण्यासाठी धूम्रपान करून रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.

रिक्षाचालकांची स्थिती बिकट

नाशिक : लॉकडाऊनच्या कालावधीत तसेच त्यापूर्वीच्या काळातही रिक्षाचालकांचा व्यवसाय पार ठप्प् झाला आहे. त्यामुळे रिक्षा चालवून कुटुंबाचे पालनपोषण करणाऱ्या रिक्षाचालकांची कुटुंबे अडचणीत सापडले आहेत. भाडे तत्त्वावर गाडी चालविणाऱ्या चालकांची तर प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे.

मोबाइल अतिवापराने नेत्रविकाराची भीती

नाशिक : कोरोनाच्या निर्बंधांमुळे मुले घरातच बंद आहेत. त्यामुळे मोबाइल, टॅब, लॅपटॉपच्या वापरासह टीव्ही पाहण्यातच त्यांचा सर्वाधिक वेळ जात आहे. त्यामुळे त्यांचा स्क्रीन टाइम वाढला असून, त्यांना नेत्रविकार जडण्याची भीती पालकांमध्ये निर्माण झाली आहे.

आईस्क्रीम व्यवसाय पुन्हा थंडावला

नाशिक : शहरात निर्बंधांमुळे केवळ उन्हाळ्यात आणि त्यातही मे महिन्यात सर्वाधिक व्यवसाय होणारा आईस्क्रीम पार्लरचालकांनाही सर्वाधिक फटका बसला आहे. आईस्क्रीमसारखे थंड पदार्थांचे सेवनही नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने कमी केले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीचा पूर्ण सीझनचा त्यांचा वाया गेला आहे.

लघु व्यवासायिकांना आर्थिक मदतीची मागणी

नाशिक : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे शहरातील अनेक उद्योग, व्यावसाय संकटात सापडले आहेत. या संकटातून उभारी घेण्यासाठी सरकारने लघु व्यावसायिकांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

समांतर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे

नाशिक: मुंबई - आग्रा रस्त्याच्या सर्व्हीस रोडवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याचे दिसून येते. रस्त्याच्या अगदी मधोमध खड्डे पडले असल्याने नागरिकांना अपघाताची भीती वाटते. त्यामुळे या मार्गाची डागडुजी करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.